Home कृषिसंपदा अवकाळी

अवकाळी

0
अवकाळी

अवकाळी

नको नको रे पावसा
असा पडू अवकाळी
दुर्दैवाचा भोगवटा
कारे सदा त्याच्या भाळी

गहू आला सोंगणीला
सुरु झाली पाखडणी
नको करू गळचेपी
मिळू दे रे दाणापाणी

का रे तू रे नेहमीच
घास तोंडचा ओढतो
माळ्यावरच्या मातीत
विष सदा कालवतो

थांबव हे तांडव तू
नको टाकू असे फास
नको विझू देवू बाप्पा
त्याच्या डोळ्यातील आस..

डॉ.लीना निकम
नागपूर