कंत्राटी अभियंता घरकुलाकरिता 4 हजाराची लाच घेताना अटक  

214
गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाही
राधाकिसन चुटे, गोंदिया जिल्हा प्रतिनिधी – गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पंचायत समिती कार्यालयात कार्यरत गृहनिर्माण अभियंत्याने प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्याकडून चुकीचे नाव दुरुस्त करुन पहिल्या टप्यातील 20 हजार रुपयाची किस्त मंजुर करण्याकरीता 5 हजाराची लाच मागितली.त्यानंतर दुसर्या किस्तचे 45 हजार रुपये मंजुर करण्याकरीता वाटाघाटीकरीत 4500 रुपये मागितले ती रक्कम देण्याची मूळीच इच्छा नसल्याने खुर्शीपार येथील घरकुल लाभार्थ्यांने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली.त्या तक्रारीच्या आधारे आज बुधवारला पंचायत समिती कार्यालय परिसरात सापळा रचून कंत्राटी अभियंता पंकज श्रीराम चव्हाण यास 4 हजार रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले.  ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वात गोंदिया येथील पथकाने केली. या घटनेची आमगाव पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.                                                                   *राधाकिसन चुटे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया*