आकाशवाणीचे सतारवादक नासीर खान यांचे निधन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7549*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

189

आकाशवाणीचे सतारवादक नासीर खान यांचे निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : आकाशवाणी नागपूरचे सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद नासीर खान यांचे बुधवारी (ता.१७ मार्च) रोजी, सकाळी मेयो रुग्णालयात निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. सुविख्यात सारंगी वादक हमीद खान यांचे ते सुपुत्र होते. १९८८ पासून ते आकाशवाणी नागपूर केंद्रात सारंगी वादक म्हणून कार्यरत होते. ते उच्चश्रेणी कलाकार होते.
मृदुभाषी आणि मनमिळाऊ स्वभावाचे नासीर खान यांनी नागपुरात आयोजित कीर्तन महोत्सव, ब्रह्मनाद, कालिदास महोत्सव , स्व. वसंतराव देशपांडे स्मृती समारोह इत्यादी प्रतिष्ठित कार्यक्रमांमधून सतार वादनाची साथ दिली होती. भारतभरच नव्हे तर इटली, फ्रान्स, इंग्लंड, स्वित्झर्लंड आदी देशांमध्येही त्यांनी सतारवादनाचे कार्यक्रम गाजविले. त्यांच्या मागे पत्नी , दोन मुले आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.