
आमदार राजुभाऊ पारवे यांनी कोविड-१९ ची लसीकरण मोहीमेचा घेतला आढावा.
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : आमदार राजुभाऊ पारवे यांनी उमरेड तालुक्यातील सिर्सी, बेला, मकरधोकडा, पाचगांव येथील पीएचसीला सुरू असलेल्या कोविड-१९ लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. 17 मार्च रोज बुधवारला उमरेड विधानसभा मतदारसंघातील उमरेड तालुक्यातील सिर्सी, बेला, मकरधोकडा, पाचगांव येथील पीएचसीला सुरू कोविड-१९ लसीकरण मोहीमेचा आढावा उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ पारवे यांनी घेतला. जास्तीत जास्त नागरिकांनी कोविड लस घ्यावी या करिता स्वत: आमदार पारवे यांनी ६० वर्षाच्या वरील नागरिकांना गाडीत बसवून लसी घेण्याकरिता पाठवले. मा. आमदार यांनी गावात जाऊन लसीकरण लावण्याकरिता प्रोत्साहित केले. सोबत सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती व सरपंच सचिव यांनी सहभाग घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेण्याकरिता प्रोत्साहित केले. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व लवकरच उमरेड विधानसभा क्षेत्रातील ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल अशी माहिती दिली.
कोरोणा झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे. सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, स्वताची काळजी घ्यावी प्रशासनाला सहकार्य करावे अशी सूचना यावेळी दिली.
यावेळी समाजकल्याण सभापती नेमावली माटे, सभापती रमेश किलनाके,जि.प.सदस्य माधुरी गेडाम, राजु सुटे, वंदना बालपांडे, सुनीता ठाकरे,उपसभापती सुरेश लेंडे, पुष्कर डांगरे, दादाराव मांडस्कर, प्रियंका लोखंडे, जयश्री देशमुख, गीतांजली नागभीडकर, शालु गिल्लूरकर, अध्यक्ष ता.कॉ.कमेटी शिवदास कुकडकर, सुभाष मुळे, अध्यक्ष, स.नि.योजना जितेंद्र गिरडकर, केतन रेवतकर, तहसीलदार प्रमोद कदम, खंड विकास अधिकारी जाधव, तालुका आरोग्य अधिकारी धर्मठोक, वैद्यकीय अधीक्षक, नायब तहसीलदार व संबंधित अधिकारी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

