विदर्भ वतन न्युज पोर्टल – टिकटाँकच्या माध्यमातून आपल्या कलेला सादर करीत राज्याला भुरळ घालणाºया पुजा चव्हाण या युवतीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी राज्यमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला़ पुजा चव्हाण हिच्या आत्महत्येने राज्यभर हळहळ व्यक्त करण्यात आली़ विदर्भातील एका बड्या नेत्याच्या संबंधाने राज्यातील जनतेलाही वाटले की सत्य बाहेर यावे़ अनेक नाट्यमय घडामोडीनंतर नेत्याच्या राजीनाम्याने सत्य बाहेर येईल ही अपेक्षा बाळगणाºयांची मात्र आता निराशा झालेली आहे़ नव्या प्रकरणांच्या घडामोडीने पुजाचे सत्य राज्यापुढे व देशापुढे कधी येईल याचीच चिंता राज्यातील जनतेला व पुजा चव्हाणच्या कुटुंबाला लागलेली आहे़

