हिरेन, वाझे, स्फोटके आणि सत्ताधारी! नेमके प्रकरण काय?

292

विदर्भ वतन न्युज पोर्टल – २५ फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील अंटालिया या बंगल्यापुढे स्फोटके (जिलेटिनच्या कांड्या) ठेवलेली स्काँर्पिओ कार आढळली़ याचा नेमका तपास सुरू असतांना ही स्फोटके नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी नजीकच्या ‘सोलर’ या कंपनीची असल्याची प्राथमिक माहिती मिळाली़ मनसुख हिरेन हे या कारचे मालक म्हणून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले़ मात्र दोन दिवसांनंतर त्यांचा मृतदेह मिळाल्याने खळबळ निर्माण झाली़ मुकेश अंबानींसारख्या नामांकित उद्योगपतीच्या संबंधीत ही घटना असल्यामुळे तपासाला अधिक वेग मिळाला़ या प्रकरणामुळे महाराष्ट्र राज्यात एकच चर्चेचा विषय आहे़ यामुळे विरोधर पक्षाने महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी काहीही कसर ठेवली नाही़ या प्रकरणाचा तपास पुढे केल्यानंतर माहिती पुढे आली की मुुंबई पोलिस खात्यातील निलंबित पोलिस अधिकारी (एन्काउंटर स्पेशालिस्ट) सचिन वाझे यांचे नाव पुढे आले़ शिवसेना पक्षाशी व पक्षातील काही नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचे सांगत विरोधी पक्ष अधिक आक्रामक झाले़ त्यामुळे अतिसंवेदनशील असलेल्या या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला़
एनआयए करीत असलेल्या तपासात असे पुढे आले की, सचिन वाझे यांचा या प्रकरणाशी संबंध असून सिसिटीव्ही फुटेजवरून हे सिद्ध होते़ स्काँर्पिओ गाडी अंबानी यांच्या घरापुढे पार्क करीत असतांना मागच्या दुसºया गाडीमध्ये सचिन वाझे हे असून त्यांनी गाडीचालकाला आपल्सा गाडीने पुढे नेल्याचे दिसले़ यामुळे एनआयएच्या तपासात त्यांनी सचिन वाझेंवर ठपका ठेवत ताब्यात घेतले़ आता एनआयएच्या तपासात सचिन वाझे यांनी उपस्थित असल्याची कबुली दिली असल्याचे माहिती पडले़ आता परत एका तिसºया गाडीचा यात संबंध असल्याचे पुढे आले आहे़ मर्सिडीज या गाडीचाही यात समावेश असल्याचे पुढे आले असून गाडीही ताब्यात घेण्यात आलेला आहे़ तसेच याच मर्सिडीज गाडीची नंबर प्लेट पार्क केलेल्या स्कार्पिओ गाडीला वापरली असल्याचे पुढे आले आहे़ या गाडीच्या डिक्कीमध्ये घटनेवेळी घातलेला शर्ट, पाच लाखांची रोकड, नोटा मोजण्याची मशिन आढळून आली आहे़ घटनेच्यावेळी पिपिई कीट घातलेला माणूस दिसत आहे़ त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात आणखी काही तथ्थ पुढे येण्याची शक्यता आहे़
प्रकरणे दाबण्यात येत असल्याचा सुर
मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रकरणांचा धडाका सुरू आहे़ ज्यामुळे महाविकास आघाडी सरकार विरोधी पक्षांच्या रडारवर आहे असेच म्हणावे लागेल़ अर्णब गोस्वामी प्रकरण राज्यभर गाजले तसेच याचा आवाज केंद्रातही पहायला मिळाला़ पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले राज्यमंत्री संजय राठोड यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला़ सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणामुळेही राज्यसरकारवर आरोप करण्यात आले होते़ आता या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सरकार गोत्यात सापडली असेच म्हणावे लागेल़