१२ जुगा-यांना अटक,माजी उपमहापौरांच्या मुलाचाही समावेश
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : पाचपावली पोलिसांनी सोमवारी सायंकाळी नाईक तलाव परिसरातील एका जुगार अड्डयावर धाड टाकून माजी उपमहापौर आणि नगरसेवक दीपराज पार्डीकर यांचा मुलगा जय पार्डीकर याच्यासह १२ जुगा-यांना ताब्यात घेतले. बांगलादेश नाईक तलाव परिसरात गणपती बोकडेच्या घरी अनेक दिवसांपासून जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच पाचपावली पोलिसांनी तेथे १५ मार्चला सायंकाळी छापामार कार्रवाई केली. यावेळी १२ जुगा-यांना मुद्देमालासकट अटक करण्यात आली आहे. त्या जुगा-यांपैकी एक प्रभाग २0 चे नगरसेवक दीपराज पार्डीकर यांचा मुलगा असल्याने सर्वत्र चर्चेला ऊत आले आहे. त्यामुळे त्याला या प्रकरणातून वाचविण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र जुगार अड्डयावरील छाप्यात पार्डीकर यांचा मुलगा पकडण्यात आल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर पसरल्याने त्याला यातून वाचविण कठीण झाले. जुगार अड्डयावर जय दीपराज पार्डीकर, पंकज वामनराव पराते, माणिक कुंदन बांगरे, संदीप महिपाल नंदनवार,गणपती बोकडे, ईश्वर गणपती बोकडे, योगेश रमेश कोहाड, धनंजय प्रभाकर गुरडे, विकास नागराज निमजे, नीतेश महादेव पौनीकर, दर्शन विनोद हजारे आणि सोनू पांडुरंग परतेवाले या जुगा-यांना पकडण्यात आले आहे.

