– विवाहितेचा विनयभंग करणा-या सहा. फौजदारास सश्रम कारावास
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गडचिरोली : विवाहित महिलेचा विनयभंग करणा-या सहाय्यक फौजदारास जिल्हा व सत्र न्यायालयाने ४ वषार्चा सश्रम कारावास व ५ हजार रुपए दंडाची शिक्षा ठोठावली आहे. गुरूदास मारोती झाडे (५७) रा. गडचिरोली असे शिक्षा ठोवण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार गुरूदास झाडे हे पोलिस मदत केंद्र धाडराज येथे नेमणुकीस असताना २८ मे २0१४ रोजी १९ वाजताच्या दरम्यान धोडराज येथील विवाहीत महिलेचा विनयभंग केल्याने पीडित महिलेच्या पतीने पोलिस मदत केंद्र धोडराज तक्रार केल्याने उपपोलिस स्टेशन लाहेरी येथे अप.क्र. ५/२0१४ कलम ३५४, ५0६ भादंवी व सहकलम ३,१ (१0)(१) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला. गुन्ह्याचा तपास भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ठाकूर करून पीडित महिलेचे व इतर साक्षीदारांचे बयाण नोंदवून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळाल्याने जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयाने फियार्दी व पीडित महिलेचे व इतर साक्षीदारांचे बयाण नोंदवून तसेच सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी आज १६ मार्च रोजी ४ वषार्चा सर्शम कारावास व ५ हजार रुपए दंडाची शिक्षा ठोठावली. पीडितेला ४ हजार नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारीत करण्यात आला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अनिल एस. प्रधान यांनी बाजु मांडली, कोर्ट पैरवी म्हणून पोउपनि नारायण बच्चलवार यांनी काम पाहिले.

