कांग्रेस पक्षाने प्रभाग 32 मध्ये साजरा केला महिला दिवस

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7451*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

172

कांग्रेस पक्षाने प्रभाग 32 मध्ये साजरा केला महिला दिवस

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर : कांग्रेस पक्षाने प्रभाग 32 मध्ये समाजसेवी महिलांचे स्वागत करून महिला दिन साजरा केला. महाराष्टÑ प्रदेश कांग्रेस कमिटीचे सचिव मा. गिरीश पांडव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गार्डन गोल्डन गृपच्या महिलांचे स्वागत करून त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर परिसरातील उद्योजक महिला अश्विनी पन्नळकर,सरोज कामळी, रेखा लोंढे, सीमा गुबे, नलिनी तायवाडे, व इतर 50 समाजसेवी महिलांना व डाक्टर व आयुक्त चे स्वागत करून त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ब्लॉकअध्यक्ष विश्वेश्वर अहिरकर,महिला अध्यक्ष संगीता उपरीकर, ब्लाक अध्यक्ष पुष्पा देशमुख, प्रकाश फुके, रसिक रानेकर, मामा राउत, सरिता लक्षणे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग 32 चे अध्यक्ष अरविंद क्षीरसागर यांनी केले. यावेळी गार्डन गोल्डन गृपच्या पुष्पा कोराडकर, विद्या बांबल, रेखा ठाकरे, माया चाफेकर, माला निनावे, आशा खापेकर, पडोळे ताई, खळतकर ताई, मंदा बरडे, सुधा निखाडे, कुचेवार ताई, लता चव्हाण, वंदना शिंदे, रेखा मोरघडे, काटोले ताई, दुरुगकर ताई, कल्पना सातपुते, रजनी वाघमारे, मीरा वाघमारे उपस्थित होत्या.