वाढोणाबंदी शिवारात तीन शेतमजुरांवर वाघाचा हल्ला

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7445*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

137

वाढोणाबंदी शिवारात तीन शेतमजुरांवर वाघाचा हल्ला

-ढाणकी परिसरात बिबट्याची दहशत
-दोन दिवसात दोन वासरे केले फस्त

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,ढाणकी : उमरखेड तालुक्यातील ढाणकी शेत शिवारात बिबट्याची दहशत वाढत असून दिनांक १३ मार्च रोजी भीमराव नाईकवाडे यांच्या शेतातील वासरावर हल्ला करून फस्त केले तर रविवारी रामचंद्र चिंचोलकर यांच्या शेतातील वासरावर हल्ला केला व ठार केले. परिसरात दिवसेंदिवस बिबट्याचे जनावरांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. कालच पैनगंगा अभयारण्यात दोन वाघाचे दर्शन झाले होते. त्यामुळे बंदी भागातील वातावरण भीतीदायक झाले झरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात सातत्याने वाढ होत आहे. झरी तालुक्यातील पवनार शिवारात मागील आठवड्यात एक गणेशपूर शेतक-याचा गो-हा आणि पवनार येतील गाईची शिकार केली तर १४ मार्चला चिंचघाट येथील शेतशिवारात वाघाने दोन बैलांवर हल्ला केला आहे. यात दोन्ही बैलांचा मृत्यू झाला आहे. वाघाच्या या हल्ल्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत आहेत. शेतकरी आणि शेत मजूर यांना काम करणे कठीण होत आहे. याचा शेती व्यवसायावर परिणाम होत आहे. नागरिकांनी या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार वनविभागाकडे केली जात आहे.