‘पाँलिटिकल कोरोना’मुळे जनतेत सरकारप्रती रोष!

422
Coronavirus economic impact concept image

अजय बिवडे, संपादक – विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – वर्ष उलटले़ आश्वासनांचे पाऊस पडले़ अपेक्षा होती ती लसीची मात्र त्यावरही संभ्रम निर्माण झाले़ रोजगार बंद आहे पण दैनंदिन जीवनाचे खर्च सुरू ़ वीजबिल भरावेच लागत आहे़ कर साथ सोडतच नाही़ घरभाडे, संपत्ती कर, पेट्रोल-डिझेल दरवाढ, घरगुती गँसचे दर वाढतच आहे़ आता पुढे काय़़़़़़तर फक्त आश्वासऩ़़़़़़होय, फक्त आणि फक्त पोकळ आश्वासन
हीच अवस्था म्हणावी आज जनतेची़ हाताला काम आहे,पण शासन म्हणते बंद ठेवा़ मग घर चालवायचे कसे़ कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा़ हा एकच प्रश्न सर्वसामान्यांभोवती फिरतो आहे़ कोरोना मारेल तेव्हा मारेल, मात्र या रोजच्या मरणाने जनतेत आक्रोश आहे़
शासन म्हणते जनतेची चिंता़ मग होत असलेली उच्चांकी दरवाढ कशासाठी़ वीजबिल माफीचा गाजर आता वाळला म्हणून वीज कर्मचाºयांच्या सोबतीला पोलिस कर्मचारी पाठवून खंडित होत असलेला वीजपुरवठा यामुळे जनतेच्या आयुष्यातच अंधार होत आहे़ पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर केंद्र व राज्य शासनाचा खेळखंडोबा सुरू आहे आणि जनतेच्या आयुष्याचा सुद्धा़

करोडोंची संपत्ती असणारे लाँकडाउन करतात, मात्र रोजंदारीवर कुटुंब चालविणाºयाचे काय़़़अशा अनेक प्रश्नांमुळे जनतेतील रोष खदखदतोय़ सरकार माय बाप म्हणणारे आता या, सरकारचे करायचे काय ? असाही प्रश्न विचारत आहे़
विरोधी पक्ष लाँकडाउनच्या विरोधात आहे़ सरकारमधील काही मंत्रीही आम्हाला न विचारता लाँकडाउन केले असल्याची ओरड करीत आहे़ अशाच काही लाँकडाउन व कोरोनाच्या बातम्यांखाली सुशांतसिंह राजपुत आत्महत्या प्रकरण, पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, महाराष्ट्र राज्याचे मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा असे अनेक प्रकरणे दडल्या गेलेली आहे़ वाढत्या दरवाढीविरोधात नागरिक आपला विरोधही दर्शवू शकत नाही असा हा पाँलिटिकल कोरोना म्हणावा लागेल़ ग्रामपंचायत निवडणुका, मंत्र्यांच्या पदग्रहण सोहळ्यावेळी कोरोना कुठे जातो हेच कळत नाही़ मात्र नागरिकांच्या लग्नसमारंभ व सार्वजनिक कार्यक्रमांमुळे कोरोना होतो़ इतर राज्यांमध्ये निवडणुका असल्यामुळे तेथे कोरोना नाही़ प्रचारही मोठ्या प्रमाणात सुरू आहे़ दिग्गज नेत्यांची उपस्थिती आहे मात्र तेथे कोरोना नाही़ आता तिथल्या निवडणुकाही पार पडणाऱ मात्र सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला की, रस्सरखेच व पळवापळवीच्या वेळी कोरोना तेथेही येईल हे मात्र नक्की़ काही नेते तर लाँकडाउन हटाव मोहिमेतही आपल्या हातात ‘धनलक्ष्मी’ प्रसन्नची अपेक्षा ठेवत आहे़ अशातच कोरोनाही पाँलिटिकल झाला असेच म्हणावे लागेल़