Home Breaking News दंड आणि दंड्याने कोरोनामुक्ती होणार का? नागरिक लसीकरणासाठी उदासीनच

दंड आणि दंड्याने कोरोनामुक्ती होणार का? नागरिक लसीकरणासाठी उदासीनच

0
दंड आणि दंड्याने कोरोनामुक्ती होणार का? नागरिक लसीकरणासाठी उदासीनच

गोपाल कडुकर – मुख्य संपादक – विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात वाढती कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता शनिवार व रविवार बाजारपेठ बंदच्या आदेशानंतर आता १५ ते २१ मार्च पर्यंत लाँकडाउन लावले आहे़ कोरोना रोगावरील लसीकरणाची सर्वांना अपेक्षा होती़ गाजावाजात ती लसही बाजारात उपलब्ध करण्यात आली, मात्र लसीकरणाचाही काही परिणात होत नाही आहे असे म्हणावे काय़ मधल्या काळात कोरोना नियमांची अंमलबजावणी न केल्याचा ठपका ठेवत दुकाने, औद्योगिक प्रतिष्ठाने, बाजारपेठांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करीत दंड वसुली करण्यात आली़ वर्तमान पत्रांमध्ये रोज ती आकडेवारी तशी प्रकाशितही करण्यात आली़ मात्र कोराना थांबला कुठे? दंड वसुलीने कोरोना थांबतो काय असाही सोशल मिडीयाच्या माध्यमातून होत असलेला हासा सर्वत्र पहायला मिळाला़ यासोबतच लग्न समारंभ व सार्वजनिक कार्यक्रमांवर नागपूर महानगरपालिका व उपद्र शोध पथकाने मोठ्या प्रमाणात कारवाई केली़ दंड वसुली करून कार्यक्रम सुरू ठेवण्याचा धडाकाही लागला़ अनेकांनी तर कारवाई केली, मात्र त्यानंतर दंडवसुलीने परतले़ चौकाचौकामध्ये मास्क न वापरणाºया नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसुल करण्यात आला़ प्रशासनाच्या इतक्या कडक कारवाईनंतरही कोरोना नियंत्रणात का नाही येत? अशा सर्वसामान्यांच्या प्रश्नानंतरही खापर शेवटी जनतेच्याच डोक्यावर फोडण्यात आले़ तर आता जनतेने साथ नाही दिली हा ठपका ठेवत थेट एका आठवड्याचे लाँकडाउन करण्यात आले़ कोरोना काळात पोलिस विभाग मोठ्या प्रमाणात सजग आहे़ सुरक्षा व नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दखल प्रत्येक पोलिस कर्मचारी घेतांना दिसले़ आपुलकी व जिव्हळ्याने कोरोना योद्धा म्हणून अनेकांना मदतही केली़ याचदरम्यान अनेक पोलिस कर्मचाºयांना कोरोना रोगाने आपल्या वेठीस घेतले व त्यांना आपले प्राण गमवावे लागले़ आता यादरम्यान पोलिस विभागानेही थेट ‘दंडा कारवाई’ करण्याचे आदेश दिले़ उपद्रवींवर दंडा कारवाईच व्हायला हवी, मात्र रस्त्यांवर ठेला लावून पोटाची खिडगी भरणाºया दैनंदिन उदरनिर्वाह धारकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसेल हे मात्र नक्की़ रिक्षाचालक, आँटोचालकांना नागरिकच नसल्यामुळे यादरम्यान रिकाम्या हातानेच घरी परतावे लागेल़ त्यामुळे कोरोना रोगावर लाँकडाउन किंवा दंड व दंड्यानेच नियंत्रण मिळेल काय हा एकच प्रश्न नागरिकांच्या मनात घुसमळत आहे़