‘लाँकडाउनला’ वैतागली जनता !

346

अजय बिवडे – विदर्भ वतन न्युज पोर्टल – नागपूर शहरात वाढत असलेल्या कोरोना संक्रमितांच्या आकडेवारीमुळे पुन्हा एकदा नागपूर शहरासह विदर्भात लाँकडाउनचे संकट आहे़ दर शनिवारी व रविवारी बाजारपेठांसह अत्यावश्यक सेवा वगळता प्रतिष्ठाने बंदच्या आदेशाने तसेही छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडलेले आहे़ अशातच १५ ते २१ मार्चपर्यंतच्या कडक लाँकडाउनच्या आदेशाने जनताच वैतागली आहे असेच म्हणावे लागेल़ कोरोनाच्या सावटाखाली मागील वर्षभरापासून असलेल्या जनतेत आता नैराश्य आलेले आहे़ मागील दोन दिवसांमध्ये दोन कलावंतांनी आर्थिक संकटामुळे केलेल्या आत्महत्येने कलाक्षेत्रातही उदासिनता पसरली आहे़ अशातच शासनाने लावलेल्या लाँकडाऊन नावाच्या तुघलकी आदेशाने लघु उद्योगांसोबतच मोठ्या व्यापाºयांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसतो आहे़ दैनंदिन रोजगारावर आधारलेले अनेक उद्योग व प्रतिष्ठाने आहे़ रोजच्या उदरनिर्वाहातून कुटुंबाचे पालनपोषण करणाºयांवर हा आर्थिक बोझा सहन करणेही अवघड झालेले आहे़ यामुळे सत्ताधारी असलेल्या शासनाविरोधात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़
नागपूर शहरात सोमवार सकाळपासूनच पोलिस यंत्रणा सतर्क आहे़ चौकाचौकामध्ये लावण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्तात नागरिकांची कसून चौकशी करण्यात येत आहे तसेच, उनाड फिरणाºया टवाळखोरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही पोलिस आयुक्तांनी दिलेले आहे़ अत्यावश्यक कामाव्यतिरीक्त रस्त्यांवर वर्दळ करणाºयांवर पोलिसांची नजर आहेच़