स्त्रियांना स्वतंत्र विचार आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाची आवश्यकता आहे-जयश्री पुंडकर
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : जागतिक महिला दिना निमित्त स्त्रियांचा सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना जयश्री पुंडकर म्हणाल्या कि, आता काही संदेह नाही कि पुरुषांच्या सोबतच स्त्रियांनीही फार मोठा अंतर पार केलेला आहे. आणि आता त्यांनी मानसिक मजबुती, विचाराने सुदृढता सोबतच आर्थिक स्वतंत्रताही प्राप्त केलेली आहे. स्त्री ला शालीनतेच्या सोबतच स्वतंत्र विचार,स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि थोडीसी आक्रमकतेची गरज आहे. स्त्रियांचे जीवन कसे हवे हे ठरविण्याचे अधिकार फक्त स्त्रियांना हवे इतरांना नको। असे उद्गार समाजसेविका जयश्री पुंडकर यांनी केले आहे. हया प्रसंगी सर्व स्त्री मैत्रिनींना
महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस स्टेशन आमगांचे उप पोलीस निरीक्षक प्रतिभा पठाडे, मीना फुल्लुंके, देवीका उके, यशोदा नाईक, सत्यशिला छिपे,रामकला उके, श्रीमती पुराम, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मृणाली उपराडे, डॉ. कुसुखपती उपराडे आणि कार्मचारीवृंद, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. कु. मृदुला टावरी, स्नेहा गुप्ता, दमयंती उपवंशी, तहसिल कार्यालयाचे श्रीमती छाया राहांगडाले, सौचंद्रकला पुंडकर, सौ. बहेकार, के.डी.भदोरिया, मंजुशा उके, उप कार्यकारी अभियंता सं. व सु. उपविभाग चे कर्मचारी श्रीमती तायडे, अंबादे ताई, मेश्राम बाई, या सर्वांचे समाजसेविका जयश्री पुंडकर, डॉ. सुनंदा नागपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

