Home नागपूर जागतिक महिला दिनानिमित्त आम आदमी पार्टी महिला आघाडी तर्फे महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त आम आदमी पार्टी महिला आघाडी तर्फे महिलांचा सन्मान

0
जागतिक महिला दिनानिमित्त आम आदमी पार्टी महिला आघाडी तर्फे महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त आम आदमी पार्टी महिला आघाडी तर्फे महिलांचा सन्मान

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : जागतिक महिला दिनानिमित्त आम आदमी पार्टी महिला आघाडी तर्फे विविध क्षेत्रात कार्य करणा?्या आशा वर्कर, सफाई कामगार, घरकाकाम करणा?्या महिला, दुकानदार महिला, आंगनवाडी सेविका, आॅटो चालक महिलांना मास्क, सेनिटायझर, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
संपूर्ण कुटुंबाला आणि पयार्याने सकस सामाजिक समाजाला घडविण्यात मोलाची भूमिका बजावणा?्या, निरनिराळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या, सक्षम प्रतिभेतून विकासाच्या प्रक्रियेत योदगान देणा-या स्त्रीशक्तीला सलाम.
ागतिक महिला दिनानिमित्त मध्य नागपूर प्रभाग १८ सिरसपेठ, सरईपेठ, दसरा रोड, रहातेकर वाडी, वकीलपेठ, शिवाजीनगर, महाल मध्ये विविध क्षेत्रात कार्य करणा-या महिलांचा आम आदमी पार्टी युवा आघाडी राज्य समिती सदस्या कृतल आकरे यांच्या उपस्थित आम आदमी पार्टी महिला तर्फे सत्कार करण्यात आला, यावेळी आम आदमी पार्टी ने महिलांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या व त्यावर आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल दिल्ली सरकार प्रमाणे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने प्रयत्न सुध्दा करण्यात आले, महिला दिनानिमित्त महिला सशक्तीकरण करण्याचा संकल्प घेऊन मोठ्या आनंदात महिला दिन साजरा करण्यात येऊन सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या देण्यात आल्या.