सी.आर.सी केंद्र नागपूरद्वारे जागतिक महिला दिन साजरा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7386*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

154

सी.आर.सी केंद्र नागपूरद्वारे जागतिक महिला दिन साजरा

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालया अंतर्गत येणा-या समेकित क्षेत्रिय कौशल्य विकास अर्थात सी.आर.सी केंद्र नागपूरच्या मानसशास्त्रविभागाद्वारे दिव्यांग बालकांच्या मातांचा सन्मान नागपूर शहराच्या पोलिस निरीक्षक श्रीमती शुभांगी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. मानवजातीच्या विकासात स्त्रीजातीचा जवळपास निम्मा हिस्सा आहे त्यामुळे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय यांसारख्या सर्वच क्षेत्रामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सामान हक्क व दर्जा प्रदान करून देणे, विकासाठी संधी उपलब्ध करून देणे, आणि स्त्री-पुरुष असमानता नष्ट करणे हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्ये आहे, असे मत देशमुख यांनी यावेळी मांडले.
महाराष्ट्र शासनाच्या २०१४ मधिल तिस-या बदलत्या महिला धोरणाला अनुसरून दिव्यांग बालकांच्या मातांना केंद्रस्थानी मानून त्यांच्याकरिता विविध योजनांची निश्चिती, स्वंयसाहाय्यता बचतगटांचा विकास, विविध लाभांच्या योजना यांचा प्रामुख्याने विचार केला जाईल तसेच महिलाआर्थिक विकास महामंडळाच्या, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यामाध्यमातून दिव्यांग बालकांच्या मातांना शिक्षण-प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील, असेप्रतिपादन सी.आर.सी. केंद्राचे संचालक श्री. प्रफुल्ल शिंदे यांनी केले.
यावेळी दिव्यांग बालकांच्या मातांकरिता विविध स्पर्धा आणि मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करून प्रेरणादायी भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख श्रीमती अपर्णा भालेराव-पिंपळकर यांनी तर आभार डॉ. अश्विनी डहाट मानले, कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वत: दिव्यांग असलेली कु. अबोली जारिट यांनी केले.