जिथे स्वच्छता राहील तिथे समृद्धी राहील : जितेश शिंदे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7376*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

231

जिथे स्वच्छता राहील तिथे समृद्धी राहील : जितेश शिंदे

-तालुकास्तरीय स्वच्छ ग्राम-हरीत ग्राम या अभियान कार्यक्रमात नोंदविला युवकांनी सहभाग

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-गोंदिया : नेहरू युवा केंद्र गोंदिया युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय,भारत सरकार एक दिवसीय स्वच्छ ग्राम-हरीत ग्राम अभियान सोमवार 8 मार्च ला श्री अर्धनारेश्वरालय शिवगन मंगल भवन हलबीटोला येथे आयोजन स्वामी विवेकानंद युवा मंडळ, बोदलबोडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 मार्च 2021 ला नेहरू युवा केंद्र गोंदिया जिल्हा युवा समन्वयक कु श्रुती डोंगरे व लेखापाल यांच्या नेतृत्वाखाली व तालुका युवा स्वयंसेवक मंगेश हत्तीमारे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ ग्राम – हरीत ग्राम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतं.
स्वच्छ ग्राम-हरित ग्राम या कृती कार्यक्रमाला हलबी टोला या गावी विविध अधिका-यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. भारत सरकारच्या विविध अभियाना मधील एक स्वच्छ ग्राम हरित ग्राम 2021 या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.त्याचाच भाग म्हणून हलबीटोला येथे या गावापासून हा कृती कार्यक्रम करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष जितेश शिंदे पोलीस हवालदार तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रकाश टेंभरे पत्रकार संघ हंसलकलाबाई शेंडे, डोंगरवार सर पोलीस हवालदार, बाजीराव तरोने यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोला पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी मान्यवर मंडळींनी गावक-यांना स्वच्छतेचे महत्व व शौचालयाचे महत्त्व पटवून सांगितले. तरुण पिढी ही व्यसनाधीनते कडे कळत आहे. याविषयी आपले मत मांडत चिंता व्यक्त केली “बेटी बचाव बेटी पढाव “या अभियाना अंतर्गत प्रत्येक घरावर मुलीच्या नावाची पाटी लावली जाणार आहे व भविष्यामध्ये हलबीटोला येथे गाव स्मार्ट बनेल अशी आशा यावेळी जितेश शिंदे यांनी व्यक्त केले.शौचालय बांधून कामाची नाही तर त्यांचा वापर आपण नेहमीच केला पाहिजे. नाहीतर आपल्याच घराच्या स्त्रिया बाहेर बसल्यावर एवढा या स्त्रियांचा अपमान होतो. त्याला पुरुष देखील मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत. प्रत्येकाला आपले घर कुटुंब निरोगी राहावे असे वाटत असेल तर शौचालयाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे गावात घाण होणार नाही व रोग नाही निर्माण होणार नाही तसेच सांडपाण्यासाठी शोषखड्डे तयार करा व आपले गाव सांडपाणी मुक्त करा प्रत्येक घरासमोर शोषखड्डा तयार करण्याचा प्रयत्न करा. आम्ही येतो व तुम्हाला सांगून जातो. परंतु ही जबाबदारी घेतली पाहिजे. तरच आपले गाव स्वच्छ गाव या नावाने ओळखले जाईल, अशी आशा जितेंश शिंदे हे अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी नेहरू युवा केंद्र गोंदिया यांच्यातर्फे स्वच्छ ग्राम- हरीत ग्राम या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्वच्छता राखणे,बंधारा बांधणे, पाण्याची बचत कशी करता येईल प्रत्येक गाव स्वच्छ कसा होईल याविषयी युवकांना पटवून देण्यात आले आणि उपक्रम राबविण्यात आले तेव्हा या कार्यक्रमास शिंदे पोलीस हवालदार, डोंगरवार सर पोलीस हवालदार, प्रकाश टेंभरे,मंगेश हत्तीमारे, बाजीराव तरोने आणि सालेकसा तालुक्यातील युवा मंडळी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले