Home दिन विषेश उमरेडच्या ओमिताची दिल्लीत भरारी

उमरेडच्या ओमिताची दिल्लीत भरारी

0
उमरेडच्या ओमिताची दिल्लीत भरारी

उमरेडच्या ओमिताची दिल्लीत भरारी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,सतीश तुलसकर-उमरेड : ती सर्वोच्च न्यायालयाची वकील कायदेतज्ञ, प्रोजुरीस लीगल लॉ फर्म या कंपनीची भागीदार, दिल्ली हुमन राईट कौन्सिलच्या राज्याच्या अध्यक्षा अशी बरीच बिरुदे आपल्या नावापुढे लावणारी उमरेडची ओमिता उन्नरकर. एका सर्वसाधारण गुजराती कुटुंबात जन्माला आलेल्या ओमिताने देशाच्या राजधानीत स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करत आपल्या ध्येयाच्या कक्षेबाहेर भरकटणा-या अनेक तरुणींना एक नवा पायंडा घालून दिलाय असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ओमिताचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. घरातून फारसं स्वातंत्र्य मिळाले नसले तरी तिने आपल्या अचाट जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दिल्ली काबीज केली.
नुकताच ६ मार्च रोजी नवी दिल्लीच्या हॉटेल ताज एम्बेसिडर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात राईझींग वुमन संस्थेच्या वतीने ओमिताला इंस्पायरिंग वुमन पुरस्कार बहाल करण्यात आला.
आपल्या जीवन प्रवासाचा उलगडा करतांना ओमिता सांगते, शालेय शिक्षणापर्यंत उमरेडच्या बाहेरचे जग कसे असेल याबद्दल मी कधी कल्पनाही केली नव्हती ते सांगताना आजही ती भावुक होते. स्वत:ची वाटचाल संघर्ष आठवताना या टप्प्यावर मागे वळून पाहताना तिला कधी हसू येते तर कधी स्वत:चेच कौतुक वाटते, आपल्या कुटुंबात महिलांना विशेष काही करण्याचे स्वातंत्र्य नसतांना देखील तिने प्रतिकूल परिस्थितून वाट काढत उमरेड ते दिल्लीचा प्रवास हा खडतर पल्ला यशस्वीरीत्या गाठला.
नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर घरात आर्थिक परिस्थिती अस्थिर झाल्यामुळे तिने नागपूरच्या एका नामांकित वकीलाकडे नौकरी करण्यास सुरुवात केली. तेव्हा तिला २५०० रुपये महिन्याला पगार मिळायचा. काही काळ नौकरी केल्यानंतर तिने यूपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्याला जायचे ठरवले, तयारी करत असतानाच तिने कायद्याचे उच्चशिक्षण पूर्ण केले यूपीएससीत तिला अपयश आल्याने ते सोडून दिले. नंतर तिला एक कंपनीत ३५ हजारांची नौकरी मिळाली आणि आता ती स्वत: एका कंपनीची भागीदार असून महिन्याला दोन लाख रुपये कमावित असल्याचे तिने सांगितले.
सध्या ती दिल्ली ह्यूमन राईट्स काउंसलिंग अंडर वुमन्स इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री याचे अध्यक्षपद भूषवत असून, भारत स्वाभिमान ट्रस्टची फाउंडर मेंबर तथा विकल्प एक समाधान या एनजीओची सक्रिय सभासद, प्रज्ञाता फाउंडेशन एनजीओमध्ये तिचा सक्रिय सहभाग आहे.
फोरेवर स्टार इंडियाच्या वतीने ओमिताला द रियल सुपर वुमन २०२० या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे जे विद्यार्थी ग्रामीण भागातून आले आहेत पण त्यांची स्वप्न मोठी आहे अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लिगल रूट लाइफ आणि फन विच सायन्स यांच्या सहकार्याने मोफत वेबिनारचे आयोजन ओमिता करते. वुमन्स इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या प्रमुख पदावर ओमित कार्यरत आहे. वुमन कॉनक्लेव्ह अँड अवार्ड्स या कार्यक्रमात या वर्षाचा बेस्ट लीगल कॉपोर्रेट पुरस्कार मिळाला आहे.
ओमिता डब्ल्यू.आय. सी. सी. आय. या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रमही घेत असते. गरजू लोकांसाठी आठवड्यातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अन्नदान, वस्त्रदान अभियान,वयक्तिक पातळीवर मानवाधिकाराचे मूलभूत कायदे सामान्य नागरिकांना समजावून सांगण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन, लहान मुलांचे भेदभाव विरहित संगोपन माहिती आणि महत्त्व या विषयावर मोफत वेबिनारचे आयोजन,मानसिक आरोग्य ,तृतीयपंथीयांचे अधिकार ज्येष्ठ नागरिकांची सामाजिक सुरक्षा आणि त्यांचे अधिकार या विषयांवर जनजागृतीचे कार्य ही संस्थेच्या माध्यमातून घेतले जातात.