Home Breaking News विदर्भातील पहिल्या ग्राफिक्स प्रिंट मशिनचा कामठी येथे शुभारंभ

विदर्भातील पहिल्या ग्राफिक्स प्रिंट मशिनचा कामठी येथे शुभारंभ

71 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – प्रिंटींगचे जग तसे वेगळेच़ सातत्याने होत असलेल्या तांत्रिक व डिजीटल बदलाचा याक्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात फटका बसला़ मात्र या बदलासोबत जो चालत राहीला तोच या क्षेत्रात नावलौकिक करू शकला असेच म्हणावे लागेल़ आज प्रिंटीग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यंत्रे उपलब्ध असली तरी कमी वेळेत, अधिक जलद कार्य पुर्ण करण्याची क्षमता तसेच मोठ्यात मोठ्या आकारात प्रिंट काढता यावी हाच या तांत्रिक बदलाचा मुख्य दुवा आहे़ अशातच प्रिंटींगच्या या बदलत्या युगात कामठी येथील काही व्यावसायिकांनी उत्तुंग भरारी घेत आपले नाव पंचक्रोशीत गाजवले आहे़
विदर्भातील पहिल्या ग्राफिक्स प्रिंट मशिनचा शुभारंभ राहुल प्रिंन्ट, हरदास नगर, कामठी येथे झाले़ यावेळी बँंक आँफ इंडिया कामठी शाखेच्या व्यवस्थापक अर्चना गणवीर या प्रामुख्याने उपस्थित होत्या़ ४४ बाय ६० इंच आकाराचे डिजीटल प्रिंट काढणे हे या मशिनचे आकर्षणाचे केेंद्र आहे़ त्यामुळे नागरिक व प्रिंटींग क्षेत्रातील व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभेल असा विश्वास राहुल प्रिंटचे संचालक गौतम नगरकर यांनी व्यक्त केला़ यावेळी राजकुमार सोनारे, राहुल नगरकर, शुभम बावनगडे, अतुल खोब्रागडे, आरजु साखरे, दिपांकर दुपारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते़