Home Breaking News भवानी मल्टिस्पेशालिटी रूग्णालयात कोरोना लसीकरणास प्रारंभ

भवानी मल्टिस्पेशालिटी रूग्णालयात कोरोना लसीकरणास प्रारंभ

206 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल,नागपूर – देशात कोरोनाचे सावट अधिक गडद असतांना काही दिलासा देणारे वृत्तांतही घडत आहे़ एकीकडे मागील काही दिवसांपासून अधिक वेगाने पसरत असलेला कोरोना तर दुसरीकडे लसीकरणाची उपलब्धता अशा संमिश्र समिकरणाने नागरिकांना दिलासा व आधार दिला आहे़ नागपूर शहरातही मोठ्या प्रमााणात कोरानाविरु द्ध लढा देत लसीकरणाला सुरूवात झालेली आहे़ शासकिय रूग्णालयांसोबतच आता खासगी रूग्णालयांनाही कोरोना लसीकरणाची जबाबदारी देण्यात आलेली आहे़
पारडी स्थित भवानी मल्टिस्पेशालिटी रूग्णालयात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला़ यावेही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले़ तसेच लसीकरणाची सोय पुढेही सुरू राहील़ यावेळी रूग्णालयाची यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी लसीकरणाला सहकार्य करण्यासाठीही शासन प्रयत्नशिल आहेत़