Home Breaking News नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जवान मंगेश रामटेके शहीद

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जवान मंगेश रामटेके शहीद

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7319*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

116 views
0

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जवान मंगेश रामटेके शहीद

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड येथील नारायणपूरमध्ये कार्यरत इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसमधील (आयटीबीपी) हेड कॉन्स्टेबल मंगेश हरिदास रामटेके (वय ४0) यांना वीरमरण आले. नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाचा स्फोट झाल्याने यात ते शहीद झाले. शहीद जवान रामटेके नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील मूळ रहिवासी आहेत. आयटीबीपीच्या ५३व्या बटालियनमधील हेड कॉन्स्टेबल शहीद मंगेश रामटेके यांचा जन्म २५ डिसेंबर १९८१ रोजी झाला. ते ६ जुलै २00७ रोजी आयटीबीपीमध्ये रुजू झाले. त्यांचे मुख्यालय आंध्रप्रदेशातील चित्तूर येथे आहे. त्यांचे कुटुंबीय भिवापूरमधील सिद्धार्थनगरला राहतात. त्यांच्यापश्‍चात पत्नी रार्जशी आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.