शासनाने वीज बिल माफी व वचनपूर्ती करावी -आपने आमदराला दिले निवेदन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7305*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

176

शासनाने वीज बिल माफी व वचनपूर्ती करावी
-आपने आमदराला दिले निवेदन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : लाकडाउन काळातील वीज बिल न भरू शकलेल्या जनतेचे वीज मिटर कापण्यास सरकारने सुरुवात केली होती, त्यावर विधानसभेत चर्चा होईपर्यंत वीज तोडणी थांबवण्यात येत असल्याचे विधान मा. उप मुख्यमंत्री यांनी काल केले आहे.
या संदर्भात लॉक डाऊन काळातील वीज बिल सवलतीची मागणी स्थानिक आमदारांनी विधानसभेत करावी म्हणून आमदारांना आप तर्फे तातडीची मेल व व्हाट्सअप मेसेज पाठवून आवाहन करण्यात आले आहे. नागपूर शहरा मध्ये उत्तर नागपूरचे आमदार व ऊर्जा मंत्री नितीन राउत, दक्षिण-पश्चिम आमदार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपड़े, पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांना इलेक्ट्रॉनिक सम्प्रेषण माध्यमातून निवेदन देण्यात आले.
ही मागणी करीत असताना शिवसेनेच्या वचननाम्याप्रमाणे ३०% दर कमी करण्याचे आश्वासन आणि काँग्रेस – राष्ट्रवादीच्या शपथनाम्या प्रमाणे औद्योगिक विजेचा दर अन्य राज्यांशी स्पर्धात्मक ठेवण्यासाठीचे आश्वासन याची आठवण करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील वीजदर देशात सर्वात जास्त असल्याने ते कमी केले तर जनतेला निश्चित दिलासा मिळू शकतो असे आप चे राज्य संयोजक रंगा राचुरे यांनी म्हटले आहे.
सर्वच भागात विना लेखी नोटीस वीज मिटर काढून नेण्यात आली असून ती नेताना जनतेला हप्ते बांधून देण्याबाबतही विद्युत अधिकारी असंवेदनशीलता दाखवत आहेत. आता किमान ती मीटर तातडीने बसवून द्यावीत अशी मागणी आम आदमी पार्टी नागपूरच्या सगळ्या आमदारांना निवेदन सादर केली आहे.
जनतेला वीज बिल सवलत देऊन दिवाळी गिफ्ट देऊ असे सांगणा-या सरकारने हा मुद्दा अधिक न ताणता आर्थिक कोंडी झालेल्या सामान्य घरगुती मीटर धारकांना सवलत द्यावी यासाठी आमदारांनी विधानसभेत आवाज उठवावा अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. हे निवेदन दक्षिण पश्चिम संयोजक अजय धर्मे, उत्तर नागपूर संयोजक रोशन डोंगरे, पश्चिम नागपूर संयोजक आकाश कावळे, पूर्व नागपूर मधून शहर सह संयोजक राकेश उराडे यांनी निवेदन दिले.