Home नागपूर रविवारला सलून व ब्यूटीपार्लर दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी

रविवारला सलून व ब्यूटीपार्लर दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी

0
रविवारला सलून व ब्यूटीपार्लर दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी

रविवारला सलून व ब्यूटीपार्लर दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपुर: रविवारला सलून व ब्यूटीपार्लर दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन नाभिक युवा शक्ती महाराष्ट्र शाखा जि. नागपुर द्वारा मा. जिलाधिकारी यांना 2 मार्च मंगळवार रोजी सोपविण्यात आले. शासनाने शनिवार व रविवार असे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळून इतर प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रविवार हा व्यवसायाचा मुख्य दिवस असल्याने रविवारी दुकान बंद ठेवले तर सलून व ब्यूटीपार्लर दुकानदारांचे आर्थिक नुकसान होते. म्हणून रविवारी सलून व ब्यूटीपार्लर दुकाने उघडण्याची अनुमती द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना नाभिक युवा शक्ती महाराष्ट्र शाखा नागपुरचे प्रदेशाध्यक्ष अमोल तळखंडे, प्रदेश सरचिटणीस प्रवीण चौधरी यांच्या आदेशा नुसार नाभिक युवा शक्ती महाराष्ट्र शाखा जि.नागपुर यांच्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.