अस्वलाच्या हल्ल्यात वन मजूर गंभीर जखमी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7287*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

280

अस्वलाच्या हल्ल्यात वन मजूर गंभीर जखमी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-अर्जुनी मोर.: अस्वलाच्या हल्ल्यात वन मजूर गंभीर जखमी झाला आहे. जख्मी वन मजूराचे नाव सुकळी ता. अजुर्नी-मोर निवासी प्रेमलाल सोविंदा मेश्राम वय 54 वर्ष सांगण्यात येते. वनमजूर गस्तीवर असताना अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. जखमी वनमजूर प्रेमलाल सोविंदा मेश्राम वय 54 वर्ष मुक्काम सुकळी हे नियत क्षेत्र मोरगाव कक्ष क्रमांक 765 राखीव वन पाथरी रीठी मध्ये दिनांक दोन मार्चच्या सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान गस्तीवर असताना त्यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला केला. त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरात असलेले नागरिक मदतीला धावून आले. त्यामुळे अस्वल जंगलात पळून गेले. अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जख्मी प्रेमलाल मेश्राम याला नजीकच्या इस्पीतळात उपचारार्थ भर्ती करण्यात आले. सध्या त्रूाच्यावर उपचार सुरू आहेत.