हायवे मृत्युंजय दूत योजनेचा शुभारंभ, मृत्युंजयदूत म्हणून नावे नोंदवा, संजय पांडे यांचे आव्हान

242
विदर्भ वतन वृत्तपत्र तथा न्युज पोर्टल
कामठी प्रतिनिधी, गजानन बोरकर –  वाहतूक नियम हे प्रत्येकाला सुरक्षित ठेवण्यासाठी तयार करण्यात आले आहेत, घरातून निघालेली प्रत्येक व्यक्ती सायंकाळी सुखरूप घरी जायला हवी हेच ह्या कायद्याला अभिप्रेत आहे.हायवे मृत्युंजय ही योजना राज्यातील महामार्गावर राबविण्यात येणार असून अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या हायवे मृत्युंजय दूत योजना या उपक्रमाचा शुभारंभ १ मार्च २०२१ ला संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आला आहे.अपघातातील जखमी ना तातडीने योग्य उपचार मिळून त्याचे प्राण कसे वाचवता येईल हाच या योजने मागील उद्देश आहे.
नागपुर प्रादेशिक महामार्ग अंतर्गत येणाऱ्या नागपूर जबलपूर महामार्गावर असलेल्या वराडा टोल नाक्याजवळ महामार्ग पोलीस केंद्र रामटेक च्या वतीने महामार्ग पोलीस चौकी येथे हायवे मृत्युंजय दूत योजनेचे उदघाटन नागपूर प्रादेशिक परिक्षेत्राचे पोलिस उपअधीक्षक संजय पांडे यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ओरिएंटल कंपनी चे नाका व्यवस्थापक अतुल आदमणे,निशांत निनावे, सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोटे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश भोयर, लाईफ लाईन इस्पितळाच्या
डॉ.तस्लिम,डॉ.संगीता पटले, समाज सेवक भगवानदास यादव, मधुकर बंड, डॉ सुंदरलाल पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अपघातातील जखमी चे तातडीने योग्य उपचार मिळवुन त्याचे प्राण कसे वाचवता येईल यावर डॉ तस्लिम यांनी योग्य मार्गदर्शन केले , संपूर्ण महाराष्ट्रातील महामार्गवर होणाऱ्या अपघातातील जखमीचा इलाज ताबडतोब व्हावा या साठी हायवे मृत्युंजय योजना सुरू केली आहे,या योजने अंतर्गत मृत्युंजय दूत ची नोंदणी सुरू केली आहे, जखमी चे प्राण कसे वाचवता येइल यावर दूत याना प्रशिक्षण देण्यात येईल तसेच दूत याना प्रोत्साहन पुरस्कार सुद्धा देण्यात येईल या साठी नागरिकांनी  मृत्युंजय दूत म्हणून नावे नोंदवून सहकार्य करण्याचे आव्हान पोलीस उपअधीक्षक संजय पांडे यांनी केले आहे.
यावेळी २२ नागरिकांनी आपली नोंदणी केल्याची माहितीआयोजकांनी दिली.त्यांना ओळख पत्र, प्रथम उपचार किट देण्यात येणार आहे.कार्यक्रमाला असंख्य पदाधिकारी व कर्मचारी यांनी कोरोनाच्या नियमाचे पालन करीत अथक परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे संचालन दुर्गेश कटरे तर आभार गणेश भोयर यांनी मानले.