नागपूर येथील इंडियन ब्युरो आॅफ माईन्स येथे 1 मार्च रोजी स्थापना दिवसानिमित्त खनिज दिवसचे आयोजन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7238*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

318

नागपूर येथील इंडियन ब्युरो आॅफ माईन्स येथे 1 मार्च रोजी स्थापना दिवसानिमित्त खनिज दिवसचे आयोजन

विदर्भ वतन, प्रतिनिधी-नागपूर : केंद्रीय खनन मंत्रालय अंतर्गत येणा-या नागपूर येथील इंडियन ब्युरो आॅफ माईन्स (आय.बी.एम.) येथे 1 मार्च सोमवार रोजी संस्थेच्या स्थापना दिवसानिमित्त खनिज दिवस साजरा करण्यात येणार आहे. कोविड -19 च्या परिस्थितीमुळे सदर आयोजन हे आॅनलाईन करण्यात येणार असून संयुक्त सचिव आणि आयबीएमचे महा नियंत्रक संजय लोहिया दिल्लीवरून या कार्यक्रमासाठी आॅनलाइन उपस्थित राहतील. याप्रसंगी मुख्य खान नियंत्रक पी. एन .शर्मा. हे अध्यक्षस्थानी राहतील तर डॉ. डी.के. सिन्हा,संचालक, आॅटॉमीकट मिनरल डायरेक्टरेट फोर क्स्प्लोरेशन अंड रिसर्च , हैदराबाद हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. 1 मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता सदर आॅनलाइन कार्यक्रमात मुख्यालय तसेच प्रादेशिक कार्यालय यामधील अधिकारी सुद्धा सहभागी होणार आहेत. याप्रसंगी डॉ. अशोक नंदी यांनी लिहिलेले वर्ल्डवाइड बॉक्साईट इंडस्ट्री इंडिया इन प्रोस्पेक्ट् आॅफ इंडिया या विषयावरील आॅनलाईन व्याख्यानमाला सुद्धा या प्रसंगी होईल.

1 मार्च 1948 या दिवशीच आयबीएमची स्थापना करण्यात आली होती 10 ते 13 जानेवारी 1947 दरम्यान नवी दिल्ली येथे बांधकाम, खाण आणि ऊर्जा विभागाने आयोजित केलेल्या खनिज धोरण परिषदेच्या विचार-अनुसंधानानुसार, राष्ट्रीय खनिज धोरण तयार केले जावे असा निर्णय घेण्यात आला . एक सक्षम तांत्रिक संस्था स्थापन करण्यास्तव १ मार्च रोजी या संस्थेची स्थापना करण्यात आली. आयबीएम खनिज उद्योगाच्या सर्वांगीण विकासात एक प्रमुख राष्ट्रीय संघटना म्हणून अस्तित्वात आली आहे आणि देशाच्या खनिज स्त्रोतांच्या वैज्ञानिक विकास आणि संवर्धनाच्या तत्त्वांमध्ये कार्यरत आहे.