मायबोली मराठी (अभंग)

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7226*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

268
मायबोली मराठी (अभंग)
मराठीचा बोल।तया खूप मोल ।
अर्थ तिचा खोल। घ्या जाणुनी ।।
संतांचा महिमा ।ज्ञाना, तुका,नामा ।
माय बोली कामा । प्रबोधने ।।
अभंगाची वाणी । भक्तीची ती गाणी।
भाषेची ती राणी। मराठीच ।।
लेखकाचा धडा। कवि काव्य सडा।
अमृताचा घडा । माय बोली ।।
महाराष्ट्राची शान । मराठीस मान ।
गाऊ गुणगान । या बोलीचे ।
मराठीची आस । राजभाषा खास ।
चैतन्याचा वास । या भाषेला।।
अवीट ही गोडी । मधुरता सोडी ।
लेखणीची जोडी । मराठीस ।।
लिहावे मराठी ।वाचावे मराठी ।
पेरावी मराठी ।सर्व मुखी ।
भाषा ही महान । संस्काराची खाण ।
फुलवा रे छान । सांगे युवा ।।
श्री.युवराज गोवर्धन जगताप
     काटेगाव ता :- बार्शी
      जिल्हा:- सोलापूर
       9405237081