
विदर्भ वतन,प्रतिनिधी-भंडारा : नगर परिषद भंडारा अंतर्गत दिनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व युनिसेफ यांच्या मार्फत दि. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हा परिषद चौक भंडारा येथे कोविड -१९ चे प्रादुर्भाव रोखण्यासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी पथनाट्याद्वारे मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टेंसिंग ठेवणे तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळणे या सारख्या बाबींवर माहिती देण्यात आली.

