ट्रक अपघातात पाच ठार….

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7198*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

249

ट्रक अपघातात पाच ठार
विदर्भ वतन,प्रतिनिधी-चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथून लग्न आटोपून एकारा येथे परत जात असलेल्या वरातीच्या ट्रकला भीषण अपघात झाला. या अपघातात पाच वराती जागीच ठार झाले आहे तर २0 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी झाला.
सिंदेवाही मेंडकी मार्गावरील कचेपार येथे हा भीषण अपघात झाला आहे हा अपघात एवढा भीषण होता की ट्रक पलटल्यामुळ े त्याखाली दबून ४ जनांचा जागीच मृत्यु झाला.
ट्रक पलटल्यामुळे त्याखाली सर्वजण अडकले. दरम्यान चार जणांचा जागीच अंत झाला. मृतकांमध्ये रघु कोराम (४१) एकारा, साहिल विनोद केराम (१४), कविता संजय बोरकर (३५), लीना भास्कर गहाणे (२७) यांचा समावेश आहे. अंजली घनशाम गहाणे ही लहानगी मुलगी या भीषण अपघातात बचावली. मात्र तिची आई लीना जागीच ठार झाली. या ट्रक मध्ये एकूण ५0 व-हाडी बसले होते, त्यात २0 गंभीर असल्याची माहिती आहे. घटनेनंतर ड्रायव्हर ट्रक सोडून पसार झाला.