सिहोरा येथील थरार…

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7193*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

243

सिहोरा येथील टायर विक्रेत्यावर धारदार चाकूने हल्ला
माजी सरपंचासह आठजण ताब्यात : दोन आरोपी फरार
प्रकरण उधारीच्या पैशाचे
विदर्भ वतन,प्रतिनिधी-सिहोरा/भंडारा : उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून सिहोरा येथील आदर्श विद्यालयाच्या शेजारी असलेल्या टायर विक्रेत्यावर माजी सरपंच व त्यांच्या खंदे समर्थकांनी धारदार शस्त्राने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला असता, टायर विक्रेता थोडक्यात बचावले. सिहोरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे आठ आरोपींना लगेच ताब्यात घेण्यात आले असून यातील दोन आरोपी फरार आहेत. सदर घटना ही बुधवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. यात फियार्दी बशीर अन्सारी चे कुटुंब दहशतीत आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार बिहार राज्यातून रोजगारासाठी बशीर अन्सारीचे कुटुंब गेल्या पंधरा वषापार्सून गावात ठाण मांडून आहेत. आदर्श विद्यालयाच्या शेजारी त्यांनी एका कांपलेक्समध्ये टायर विक्रीचे व पंचर दुरुस्तीचे दुकान थाटले आहे. लगतच असलेल्या मच्छेरा गावात बशीर अन्सारीचे कुटुंब स्थायी झाली आहेत. त्यांनी याच गावात घराचे बांधकाम केले आहे. टायर पंचर दुरुस्ती व ट्रक, ट्रॅक्टरचे टायर विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. मागील दोन वषार्पूर्वी वारपिंडकेपारचे माजी सरपंच ओमकांत बुरडे यांनी ट्रॅक्टरचे टायर खरेदी केले होते. परंतु टायर विक्रेते बशीर अन्सारी यांना उधारीचे पैसे दिले नव्हते, दरम्यान उधारीचे पैसे मागत असल्याचा राग ओमकांत बुरडे यांचे मनात खदखदत होता. मंगळवारच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास ओमकांत बुरडे यांनी टायरच्या दुकानात असणाºया अकबर हुसेन व नजीर पठाण यांच्या सोबत भांडण केले. लगेच अकबर हुसेन व नजीर पठाण यांनी टायर दुकानाचे मालक बशीर अन्सारी यांना माहिती दिली. या भांडणाकडे दुर्लक्ष करीत बुधवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सकाळी बशीर यांनी दुकान उघडले असता सकाळी १० वाजता ओमकांत बुरडे यांनी आपल्या आठ-दहा समर्थकासह हल्ला चढविला व दुकानाची तोडफोड केली. हल्लेकरांजवळ धारदार चाकू व लाठ्या होत्या. टायर विक्रेते बशीर अन्सारी यांना प्राणघातक हल्ला होण्याची कल्पना होताच दुकान सोडून पळ काढला. ते पळून जाण्यात यशस्वी झाल्यानेच ते बचावले, अन्यथा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
दरम्यान घटनास्थळावर परिसरातील अनेक नागरिक जमा झाले होते. व त्यांनीच सिहोरा पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लगेच आपली समयसूचकता दाखवीत घटनास्थळावरून आरोपी माजी सरपंच ओमकांत बुरडे वय (४५), योगेश बुरडे (२८), भूमेशवर बुरडे (२५), खुशाल बुरडे (२२), किरण आंबेडारे (२९), तुषार पारधी (२५), अमित पटले (२४), सर्व राहणार वारपिंडकेपार, भूमेश डोये (२४) रा. सकरला(धोप) यांना अटक करण्यात आली असून घटनास्थळावरून प्रमोद तितिरमारे (२३) व अमित धांडे (२५) रा. वारपिंडकेपार हे दोन्ही आरोपी फरार आहेत. सिहोरा पोलीस फरार आरोपिंचा शोध घेत असून आरोपींचे विरोधात सिहोरा पोलिस स्टेशन मध्ये भादंवि चे १४३,१४४, १४७, १४९, १५३, ४५२, ४२७, ५०४, ५०६, ३७(१), (अ), १३५ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन सिहोराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.