Home Breaking News तो पायी जात होता…आणि काय घडले…

तो पायी जात होता…आणि काय घडले…

0
तो पायी जात होता…आणि काय घडले…

भरधाव वाहनाचा धडकेत एकाचा मृत्यू
विदर्भ वतन,प्रतिनिधी-भंडारा : चारचाकी वाहनाचा धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना तुमसर येथील बावनकर चौकात घडली़ रतन चिंतामन हरडे असे मृतकाचे नाव आहे़
रतन हरडे हा बावनकर चौकातून पायी जात असतांना आरोपी वाहन चालक डेवीड धकाते (४०) रा़.सिहोरा याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व हयगयीने लावून रतन चिंतामन हरडे याला धडक देवून जखमी केले. त्याला उपचारा करिता सामान्य रुग्णालय भंडारा येथे नेले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला़ मनीषा रतन हरडे यांचा तक्रारीवरुन तुमसर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला़