
विदर्भ वतन,प्रतिनिधी-नागपूर : दक्षिण नागपूर हुडकेश्वर रोड, संत तुकाराम महाराज चौक, न्यु सुभेदार नागपूर येथील पांचाळ सुतार बहुउद्देशीय सेवा संस्थेतर्फे संस्थेची कार्य व उदिष्टे सुतार समाजास माहिती व्हावी या करिता नुकतेच आमदार मोहन मते (दक्षिण नागपूर) यांच्या हस्ते सदस्य नोंदणीचा कार्यक्रम आयोजीत करुन नोंदणी शुभारंभ करण्यात आला. कोरोना विषाणूमुळे जागतिक संकट निर्माण झाले असता समाज बांधवांचे दैनंदिन काम घंटे ठप्प /चंद माल्यामुळे समाज बांधव आर्थिक विवंचनेत आले होते. सुतार समाजावर उपासमारीची वेळ आली असता संस्थेच्या वतीने पुढाकार घेवून मागील ४ एप्रिल २०२० ते १७ मे २०२० या दरम्यान समाजातील (११००) अकराशे गरजू लोकांना संस्थेच्या वतीने धान्य वाटप करून सहकार्य केले. नगर परिषद वानाडोंगरीच्या परिसरात मा. पंडित शंकरराव देविकर (अध्यक्ष -पांचाळ सुतार बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपूर) यांनी संस्थेला सवा करोड रुपये किमतीची जागा (भूखंड) दानात दिली. सुतार समाजातर्फे त्यांचे अभिनंदन व स्वागत आहे. सुतार समाजाला दान मिळालेल्या संस्थेच्या स्वमालकीच्या भूखंडावर अनेक योजना, राबवून-उद्देश आहे. तसेच समाज संघटन व एकत्रिकरण, बाहेर गावच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक काळात राहण्याची निशुल्क व्यवस्था करणे, सामूहिक विवाह, समाजातील गरीब मुला- मुलींचे लग्ना प्रसंगी समाज भवन उपलब्ध करुन देणे, वधु-वर माहिती व सूचना केंद्र स्थापित करणे. औषधोपचार घेणा-या बाहेर गांवच्या रुग्णाच्या नातेवाईकास राहण्याची नि:शुल्क व्यवस्था करणे, तांत्रिक शिक्षणासह इतर शैक्षणिक वर्ग चालविणे, समाजीतील निराधार, बेरोजगार मुला-मुलींना स्वयंरोजगारा करिता मार्गदर्शन व जागा उपलब्ध करून देणे, जेष्ठ नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांची माहिती व त्याचे फायदे मिळण्यास मदत करणे, व इतर समाजपयोगी कार्यक्रम राबविणे. त्याकरिता सुतार समाज बांधवांनी १८ वर्षाच्या वरील पुरुष व महिलांनी सभासद नोंदणी करावी. व संस्थेतर्फे समाज सेवेच्या कार्यात सहभागी व्हावे व सहकार्य करावे. असे आव्हान पांचाळ सुतार बहुउद्देशिय सेवा संस्था मार्फत समाज बंधु आणि भगिनिंना करण्यात येत आहे. अशी माहिती परिषदेत “पांचाळ सुतार बहुउद्देशीय सेवा संस्थे ” चे अध्यक्ष पंडित शंकरराव देविकर, उपाध्यक्ष अरुण वेरुळकर, सचिव गजानन तांदुळकर, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर बाळापूरे, राजू नानोटकर, संचालक रमेशराव लुढेकर हे सर्व उपस्थित होते व इतर पदाधिकान्यांनी माहिती सादर केली.
—————-

