Home नागपूर तुकडोजी चौकात मनसे महिला सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन

तुकडोजी चौकात मनसे महिला सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7163*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

162 views
0

विदर्भ वतन,प्रतिनिधी-नागपूर : मनसे महिला सेने तर्फे पीडित, शोषित, फसवणूक झालेल्या महिलांना न्याय मिळविण्यासाठी महिलांच्या हक्काचे कार्यालय शिक्षक सहकारी बैंक तुकडोजी चौक, मानेवाडा रोड, नागपूर येथे सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. वर्षभर आपण जनहितार्थ कामे करत असतो या जनहितार्थ कामाची पावती मागण्याची वेळ म्हणजे समोर निवडणूका आहे. त्याकरिता जनतेची अनेक जोमाने कामे करून येणा-या महानगरपालिकेमध्ये जनतेचे प्रतिनिधी नगरसेवक म्हणून निवडून जा. असे प्रदेश सरचिटणीस हेंमत गडकरी यांनी महिला सेनेच्या जनसंपर्क कार्यालय उदघाटन प्रसंगी बोलत होते. कोरोना काळात मनसे हाच पक्ष जनतेचा आधार बनला होता. हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने अनुभवले, जनतेची विशेष काळजी घेतली, कुठल्याही प्रसिद्धीच्या माघे न धावता सतत जनतेची कामे करणारा पक्ष म्हणजे मनसे आहे. जनतेची समस्या सोडवून जनतेची मने जिंका तरच निवडणूक जिंकने शक्य होईल असे प्रतिपादन हेमंत गडकरी यांनी नागपूर महिला सेनेच्या कार्यालय उदघाटन प्रसंगी आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमात प्रास्ताविक करतांना शहर अध्यक्ष सौ. मनीषा पापडकर यांनी सांगितले की, या महिला सेनेच्या कार्यालयातून महिलाच्या हिताची कामे नेहमीच होत राहिल. महिला, जेष्ठ नागरिक यांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला सेना नेहमीच तत्पर राहिल. असा विश्वास दिला. याप्रसंगी कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष किशोर सरायकर यांनी महिलांना सरकारी योजनेचा लाभ मिळावा याकरिता महिला सेना यांनी विशेष लक्ष द्यावे. असे मत व्यक्त केले. यावेळी शहर अध्यक्ष विशाल बडगे, शहर उपप्रमुख प्रशांत निकम, विदर्भ प्रभारी आदित्य दूरुदकर [विद्यार्थी सेना] महिला सेनेच्या शहर अध्यक्षा मनीषा पापडकर, संगीता सोनट्टके, अर्चना कडू, स्वाती जैस्वाल, पूनम चाडगे, मंजूषा पानबुडे, आचलताई मेसन, रोजगार स्वयंरोजगार सेलचे विक्रम गुप्ता, वाहतूक सेलचे मंगेश शिंदे, योगेश चौरासिया, जिल्हा अध्यक्ष दिनेश ईलमे [विद्यार्थी सेना ] सुभाष ढबाले, राम मांडवगडे, अनेक महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते.