वरठी येथे तरूणावर हॉकी स्टिकने हल्ला,आरोपी पसार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7156*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

182

-जखमी तरूणावर भंडारा येथे उपचार सुरू

विदर्भ वतन,प्रतिनिधी-भंडारा : मजुरीचे काम आटपून घरी परतत असणा-या एका तरुणावर तिघांनी हॉकी स्टिक सह लाठ्या काठ्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी वरठी येथे घडली. जखमी अवस्थेत त्याला रस्त्यावर सोडून आरोपींनी पळ काढला. याप्रकरणी वरठी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयेश शिंदे (30) रा. हनुमान वार्ड वरठी असे जखमीचे नाव आहे. या घटनेची माहिती त्याच्या भावाला होताच त्याने घटनास्थळ गाठून जयेशला भंडारा येथील एका खाजगी रूणालयात उपचारासाठी दाखल केले. जयेश गंभीर जखमी झाला असून त्याचा उपचार सुरु आहे. जयेशच्या जबाणीवरून पोलिसांनी दिनेश राठोड त्याच्या दोन सहका-याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरठी येथे गत काही दिवसापासून गैंगवार भडकल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.