अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7152*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

200

विदर्भ वतन,प्रतिनिधी-भंडारा : समोरुन अचानक वाहन आल्याने अनियंत्रित होऊन रस्त्याच्या खाली कोसळून गंभीर जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला. हा अपघात साकोली तालुक्यातील शिवनीबांध येथे ४ फेब्रुवारी रोजी झाला होता.
संगम मनोज जांभूळकर (२३) रा. बाम्पेवाडा ता. साकोली असे मृताचे नाव आहे. तो आपला मित्र गोलू कोचे रा. वळद याच्या दुचाकीवर बसून साकोली वरून मोरगाव अजुर्नीकडे जात होता. यावेळी अपघात होवून संगमच्या डोक्याला मार लागला. त्याला नागपूर येथे उपचारासाठी दाखल केले असता मृत्यू झाला. साकोली ठाण्यात प्रकरण नोंदविले आहे.