Home Breaking News टिप्परने ब्रेक मारला अन दुचाकीस्वार आदळून झाला ठार

टिप्परने ब्रेक मारला अन दुचाकीस्वार आदळून झाला ठार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7149*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

129 views
0

विदर्भ वतन,प्रतिनिधी-भंडारा : भरधाव टिप्परने अचानक ब्रेक मारल्याने त्यावर आदळून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मोहाडी तालुक्यातील वरठी येथील टी पाइंटवर मंगळवारी रात्री घडली. रामूसिंग मान्सू चंद्रवंशी (२३) रा, गोपाळगंज शिवणी (मध्यप्रदेश) असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या दुचाकीने वरठीकडून टी-पॉईंटकडे जात होता. त्याच्या समोर सिमेंट मिक्सरचा टिप्पर भरधाव वेगाने धावत होता. टिप्पर चालकाने अचानक ब्रेक मारल्याने रामसिंग दुचाकीसह टिप्परवर जावून आदळला. त्यात तो ठार झाला. मृतकाचे वडील भंडारा रेल्वे स्थानकावर कार्यरत आहे. स्वगावी परत जात असताना हा अपघात घडला. याप्रकरणी चंद्रशेखर बसत खोब्रागडे रा.वरठी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून सिमेंट मिक्सर टिप्पर (सीजी-१० एमएम ८३७ चालकाविरुद्ध वरठी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार टेगरी करीत आहे. वरठी येथे गत काही दिवसांपासून वाहतूक विस्कळीत झाली असून भरधाव वाहने अचानक कुठेही थांबविली जात असल्याने अपघातात वाढ झाली आहे.