
गुजरातचे नागरीक राज्याच्या विकासासाठी भाजप-काँग्रेसला पर्याय शोधत आहेत : आम आदमी पार्टी
महाराष्ट्रासह गोवा ते गुजरातमध्ये भाजप-काँग्रेस सारख्या प्रस्थापित राजकीय पक्षांना सक्षम पर्याय म्हणून आप उदयास येत आहे
विदर्भ वतन,प्रतिनिधी-नागपुर : आम आदमी पाटीर्चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात गेल्या काही वर्षांपासून भारतभर आपचा विस्तार होत आहे. गुजरातच्या नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने लक्षवेधी प्रवेश केला. सर्वच राज्यातील नागरिक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे विकास आधारित राजकीय मॉडेल सक्षम पर्याय म्हणून स्वीकारत आहेत.
गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला असूनही आपने अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी केली आणि ही बाब आमचाही आत्मविश्वास वाढवणारी आहे, असे आप महाराष्ट्रचे संयोजक रंगा राचुरे यांनी म्हटले आहे
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या सहा वर्षांपासून शिक्षण, आरोग्य सेवा, वाहतूक, पाणी, वीज आणि इतर क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. पयार्यी राष्ट्रवादी राजकीय विचारसरणीचा उत्तम पक्ष म्हणून आम आदमी पार्टी पुढे येत आहे. गुजरातमधील सुरत महानगरपालिका निवडणुकानी नागरिकांनी हे दाखवून दिले आहे.
गुजरात हा नेहमीच भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहीला आहे. परंतु या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि आप नेते यांनी गुजरातचे अध्यक्ष गोपाल इटालिया यांच्या नेतृत्वात गुजरातमधील नागरिकांपर्यंत दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या विकासाचे मॉडेल पोहचवण्यात यशस्वी झाले आहेत असेच म्हणावे लागेल.

