
संत गाडगेबाबा
सखुबाई झिंगराजी
यांच्या पोटी जन्मा आले
संत रे गाडगेबाबा
राष्ट्रसंत हो जाहले
होती किर्तन आवड
केली मनाची स्वच्छता
जाती भेद रे गाडूनी
केली निर्माण एकता
हाती घेऊनिया झाडू
करी चकाचक गाव
संत स्वच्छतेचा भोक्ता
बाबा गाडगे रे नाव
संसारात रे रमूनी
केली ईश्वराची भक्ती
जागे करुनी जगाशी
दिली कर्मकांड मुक्ती
भूतदया रे पेरली
बांध प्रथेस घातला
पशुहत्या नाही बरी
त्यांनी निर्बंध आणला
दीन दुबळ्या कल्याणा
दिन रात रे राबले
मुखी भजन किर्तन
बीज स्वच्छता पेरले
प्रथा प्रवृत्ती अनिष्ठ
केला टिकेचा प्रहार
साधी राहाणी ठेवून
दिला विज्ञान विचार
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता :-बार्शी
9405237081
राष्ट्रसंत गाडगे बाबा (अभंग)
देवाच्या राउळी । नको प्राणी बळी ।
अंधश्रद्धा मळी । दूर लोटा ।।
नको ते अज्ञान । कर्जा खाली मान ।
सावकारी रीन । काढू नका ।।
खरी नव्हे जादू । मंत्र-तंत्र भोंदू ।
कायमचे गोंदू । मनावर ।।
अनाथांस साथ । मदतीचा हात ।
पेटवली वात । समाजात ।।
मानवा हो जागा । बंधूतेने वागा ।
हाच खरा धागा । समतेचा।।
नको मूर्ती पूजा । मानवास भजा ।
करा त्यांची पूजा । मनोभावे ।।
स्वच्छतेचा चंग । कीर्तनात दंग ।
आरोग्याचे रंग । भरी सदा ।।
व्यसन ते सोडा । कायमचे गाडा ।
दिला हाच धडा । जनतेस ।।
समाजाची सेवा । हाच गोड मेवा ।
देह झिजवावा । दुजासाठी ।।
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता:- बार्शी
9405237081

