महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय अधिकारी संघटेनेची सर्व साधारण सभा संपन्न

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7116*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

429

विदर्भ वतन,प्रतिनिधी-नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातील जवळपास ३ हजार राजपत्रित अधिकारी यांचे प्रतिनिधित्व करणा-या महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेच्या विद्यमान राज्य कार्यकारिणीस एक वर्ष पूर्ण झाले असून त्या निमित्ताने दि. २० व २१ फेब्रु, ला नागपूर येथे राज्य कार्यकारिणीची अमरावती व नागपूर विभागातील संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष व सचिव यांचेसोबत मीटिंग आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेच्या सभागृहात झालेल्या ह्या बैठकीस विदर्भातील ११ जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्य संघटनेने गेल्या वर्षभरात केलेल्या विविध कामांचा अहवाल सादर करण्यात आला. पुढे येणा-या काळात संघटनेची वाटचाल कोणत्या दिशेने असेल याबाबत सविस्तर चर्चा या निमित्ताने करण्यात आली. कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीतही पशुवैद्यकीय सेवा सुरळीत आणि अविरतपणे सुरू ठेवल्याबद्दल तसेच त्यानंतर लगेच उद्भवलेल्या लंपी स्किन आजार आणि बर्ड फ्लू ह्या साथरोग नियंत्रणासाठी अविरत कष्ट केल्याबद्दल राज्यभरातील पशुवैद्यकाच्या अभिनंदनाचा ठराव याप्रसंगी एकमताने घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना नेहमीच ग्रामीण भागात पशुपालकाभिमुख सेवा देण्याबाबत अग्रही राहिली आहे. संघटनेचे सदस्य असलेले बहुतांश पशुधन विकास अधिकारी हे शेतकरी कुटुंबाच्या पार्श्वभूमीचेच असल्याने पशुपालकांना नेहमीच सामाजिक जबाबदारी आणि सहिष्णुतेच्या भावनेतून घरपोहोच पशुवैद्यकीय सेवा देत असतात. फेब्रुवारी २०२१ च्या दुस-या आठवड्यापासून महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाने कोरोनात्तर काळात स्वत:ला सावरण्या बरोबरच प्रशासकीय कामकाज अधिक सुरळीत आणि गतिमान करण्यासाठी राज्यभर ‘माझे कार्यालय माझी जबाबदारी अभियान ‘ राबविण्याचे जाहीर केले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना सुद्धा ग्रामीण भागातील अर्थकारणाचा कणा असलेल्या पशुपालन व्यवसायाच्या अधिकाधिक प्रगतीसाठी आणि पशुपालक यांच्या प्रती असलेल्या सामाजिक जाणिवेतून ‘ माझा पशुपालक माझी जबाबदारी’ हे अभियान राज्यभर राबविण्याचे जाहीर करत आहे. आपल्या दैनंदिन कामकाजात पशुवैद्यकीय दवाखान्यात येणा-या प्रत्येक पशुपालकास तर आम्ही सेवा देतोच, परंतु बहुतेक सेवा आम्ही घरपोहच देत असतो. पशुपालक यांच्या केवळ आजारी जनावरांचेच नव्हे तर इतर जनावरांचे आरोग्य उत्तमोत्तम राहून आधिकाधिक उत्पादन कसे मिळेल यासाठी आधुनिक पद्धतीने चारा उत्पादनापासून, चारा प्रक्रिया, आधुनिक शेळीपालन, जनावरांचे दैनंदिन व्यवस्थापन, कालवड व्यवस्थापन बाबत प्रत्येक गोठा भेटीवेळी आपले अधिकारी सहज मार्गदर्शन करत असतात. तसेच पुढील पिढी कशी अधिक उत्पादकता असलेली निर्माण होईल याकडेही आमचे कृत्रिम रेतन करताना विशेष लक्ष असतेच. आधुनिक पशुपालन व्यवसायातील जागतिक स्पर्धेच्या युगात आपले पशुपालक उभे राहिले पाहिजेत, त्यांच्यात पशुपालक उद्योजकतेची भावना वाढीस लागली पाहिजे ह्या सद्भावनेतून ह्या गोष्टी अधिक प्रभावीपणे अभियान स्वरूपात राबविण्याचा मनोदय असल्याचे संघटनेचे अध्यक्ष आणि उपस्थित राज्य आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी, मनोदय व्यक्त करताना विविध जिल्हा प्रतिनिधी यांनी संघटनेच्या वर्षभरातील एकंदर वाटचाली बद्दल समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पोहरकर यांनी पशुवैद्यक परिषदे मार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रम बाबत उपस्थितांना संबोधित केले आणि पशुवैद्य दवाखान्यांसाठी ट्रल्ल्रे४े २३ंल्लं१२ि ीि५ी’ङ्मस्र करण्या बाबतच्या गरजेचे सूतोवाच केले. सदर बैठकीस संघटनेचे राज्याचे अध्यक्ष डॉ.रामदास गाडे, कार्यकारी अध्यक्ष डॉ. शशिकांत मांडेकर, सरचिटणीस डॉ.संतोष वाकचौरे, कोषाध्यक्ष डॉ.मुकुंदा जोगेकर, उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र गायकवाड व डॉ. रामेश्वर अढाऊ तसेच विभागीय सचिव डॉ. विनोद समर्थ आणि डॉ. योगेश शेळके यांच्यासह सहआयुक्त डॉ.भोजणे, उपायुक्त डॉ. वंजारी, जिल्हा पशुसवर्धन अधिकारी डॉ.केने, सहाय्यक आयुक्त डॉ.शेटे, डॉ.अरविंद ठाकरे, डॉ.जुमडे, डॉ.दीपक कडू, डॉ. कमलेश श्रीरामे, डॉ. लाडुकर, डॉ. लैक खान, डॉ. खोब्रागडे, डॉ. खोपडे, डॉ. गोस्वामी, डॉ. दिशेट्टीबार, डॉ. लोहकरे, डॉ. देशमुख, डॉ. रवींद्र मांडेकर, डॉ. नाकाडे, डॉ. पटेल, डॉ. मंदार मराठे, डॉ. कोटांगळे, डॉ. पखाले, डॉ. तापस, डॉ. पुरुषोत्तम वानखेडे, डॉ. मंडलिक, डॉ. गोपाळ ठाकूर, डॉ. अभय भालेराव, डॉ. भिसेकर, डॉ.गोबदे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.समर्थ यांनी केले तर आभार डॉ.जोगेकर यांनी मानले. यशस्वीरित्या करण्यासाठी नागपूर जिल्हा कार्यकारिणी व सदस्यांनी परिश्रम घेतले.