फार्म्स फर्नीचर कंपनीच्या 100 कामगारांची रेपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7110*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

225

विदर्भ वतन,प्रतिनिधी-नागपूर : कोरोना प्रादुर्भाव वाढतीवर असल्याचा धोका लक्षात घेउऊन फार्म्स फर्नीचर कंपनीच्या 100 कामगारांची रेपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची दखल घेत खैरीचे सरपंच व कामठी सरपंच परिषदेचे अध्यक्ष मोरेश्वर कापसे यांनी तात्काळ कामगारांची टेस्ट करवून घेतली. याप्रसंगी सरपंच मोरेश्वर कापसे, कंपनी व्यवस्थापक यशवंत घ्यार, सामुदायिक आरोग्य अधिकारी डा. वैशाली गोनाडे, विद्या राउत, आरोग्य सेवक तुषार मून, आरोग्य सेविका संगीता उमाठे उपस्थित होते. तसेच खैरी हद्दीतील सर्व कंपनी, शाळा, पेट्रोलपंप, गावातील व्यावसायिकांना कैम्प लावून कामगारांची चाचणी करण्याचे पत्र जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.