संतोषी नगरात शिवनिष्ठा फाउंडेशन तर्फे विविध स्पर्धेचे आयोजन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7097*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

218

विदर्भ वतन,प्रतिनिधी-नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 16 ते 18 या दरम्यान शिवसोहळा शिवनिष्ठा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला. यामधे लहान मोठ्या, व्यक्तीने भाग घेतला यामधे चित्रकला स्पर्धा वक्तृव स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात आले. त्याच दिवशी 19 तारखेला नेत्र तपासणी. एक्सरे, राशन कार्ड, आयुष्यमान भारत, विमा कार्ड, पॅन कार्ड शिबीर संतोषीनगर येथे संतोषी माता मंदिरात घेण्यात आले. याप्रसंगी नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. 20 तारखेला बक्षिस वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे खासदार कुपाल तुमाने तसेच परीक्षक इतिहासाचे शिक्षक मुकदल साहेब तसेच हेडमास्तर, बालमवारताई यांच्या उपस्थित कार्यक्रम शिवछत्रपती याची मानवंदना करुन सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी शिवनिष्ठा फाउंडेशन अध्यक्ष दीपक पोहनेकर, उपाध्यक्ष सिध्दुजी कोमजवार, सचिव महेन्द्र भावसार, सदस्य मुकेश चौखंडे. प्रसन्न चौखंडे, सौरभ सगने, संजयजी पांडे, शैलेन्द्र आंबीलकर, सुरेंद्र आंबीलकर, सुरेश पटले, गौरव गडेकर, मयुर भोसले, सौरभ जगशेटटीवार. सुनील पिपंले, राधेश्याम राजपूत, कुणाल वानसकर, सिध्दांत झिलपे, अक्षय वाकडे, विशाल रांखुडे व सर्व शिवनिष्ठा फाउंडेशन मित्र परिवार यामध्ये उपस्थित होते.