
विदर्भ वतन, प्रतिनिधी-नागपूर : नागपूर दि राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटी इंडिया च्या वतीने 22 फेब्रुवारी 2021 ते 27 फेब्रुवारी 2021 दरम्यान एन. एम.सी. क्रीडा संकुल नागपूर येथे सात दिवसीय प्रशिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.या सप्ताहाचे उदघाटन केंद्रीय क्रीडा मंत्री खा. किरेन रिजुजी यांच्या हस्ते सोमवार 22 फेब्रुवारी रोजी सांयकाळी 4 वाजता होणार आहे. तर समारोप 27 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री खा.नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या वेळी प्रशिक्षणार्थी व विजेत्यांना जीवरक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटी ही संस्था गेली 23 वर्ष या क्षेत्रात प्रशिक्षणाचे व आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य करीत आहे. आतापर्यंत देशभरातील 28 राज्यात या संस्थेने 6 लाखापेक्षा अधिक लोकांना प्रशिक्षण देऊन “जीवरक्षक” बनविले आहे. हा नवा विक्रम या संस्थेने केला आहे. नागपुरात होणा?्या या सप्ताहात प्रथोमोपचार प्रशिक्षण, तलावातील व समुद्रातील बुडणा-या नागरिकांना वाचवण्यासाठी विशेष जीवरक्षकाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. व्यवस्थापन व प्रक्रिया तसेच रस्ता सुरक्षा (अूू्रीिल्ल३) जीवरक्षक प्रशिक्षण, जीवरक्षक क्रीडा स्पर्धा प्रशिक्षण व तयारी तसेच आशा विविध जीवरक्षक स्पधेर्चेही आयोजन यावेळी करण्यात आले आहे. या सप्ताहात प्रथमोपचार तद्द कांचन म्हात्रे, तरुण मुर्गेश , जलतरण आपत्ती तद्द टॉम जोसेफ , पार्था वाराणसी , कौस्तुभ बक्षी ,जेकेब विजयकुमार यासारखे नामवंत तद्द प्रशिक्षण देणार आहेत. तरी या उपक्रमाचा लाभ विद्यार्थी, युवक व नागपूरकर नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांचे वतीने करण्यात येत आहे. या सप्ताहाचे आयोजन राष्ट्रीय लाईफ सेव्हींग सोसायटी चे अध्यक्ष अडमिरल पी.डी.शर्मा (निवृत्त) यांनी केले आहे. त्याबरोबरच संस्थेचे प्रमुख कविता शर्मा प्रफुल्ल पांड्ये, कौसतुभ झिरपे, निरंजन कुलकर्णी, विरोत्मा डानियल यांनी केले.

