Home नागपूर वाडीत शिवसेनेचे छत्रपती शिवरायांना अभिवादन

वाडीत शिवसेनेचे छत्रपती शिवरायांना अभिवादन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7051*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

228 views
0

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल नागपूर.वाडी प्रतिनिधी : वाडी: दिनांक 19 फेब्रुवारी . हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती महाराजांची जयंती वाडी शहर शिवसेनेने अत्यंत उत्साहात साजरी केली. आदर्श नगर चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथील शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळयाची शहर प्रमुख मधु माणके-पाटील यांनी विधीवत पुजा करून माल्यार्पण केले. यावेळी “जय भवानी जय शिवाजी” च्या गगनभेदी घोषणांनी जवळपासचा परिसर शिवमय होऊन गेला होता.  यावेळी सर्वत्र भगव्या पताका व भगवे झेंडे यांनी परीसर भगवामय दिसत होता. शिवसेना शहरप्रमुख मधु माणके-पाटील यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मिठाईचे वितरण करण्यात आले. यावेळी दिवाकर पाटने, संजय अनासाने, संतोश केचे, रूपेश झाडे, भाऊराव रेवतकर, अखिलेश सिंग, राकेश अग्रवाल, शिवम राजे, प्रज्वल अतकरी, मदनसिंग राणा, संतोश केसरवानी, सचिन पाटील, प्रमोद जाधव, दिनेश तिवारी, चंदन दत्ता, सौरभ घडीनकर, भोजराज भोंगळे, रणजीत सोनसरे, क्रिष्णा रायबोले, सतपाल सिंग राजपूत, चेतन बडगे, उमेश महाजन, जगदीश पटले, अजय देशमुख, महेश पिंगळे, वैभव राजे, अभय वरघंटीवार, मोहीत माणके, विपुल माणके, विनय वडे, श्रीकांत निनावे,  श्यामलाल सकलानी, शत्रुघन परीहार, आदित्य हेंबाडे, गुलशन शेंडे, गौरव उगले, आकाश बोंडले, मोहित चैाधरी, राज सरडे, आदित्य लोनकर, रितीक शर्मा, विठठल राव इत्यादी शिवसैनिकांनी मोठया प्रमाणावर उपस्थिती दर्शविली.