विदर्भातील दोन जिल्ह्यात लाँकडाऊनची घोषणा, यंत्रणा सज्ज

275
विदर्भ वतन न्युज पोर्टल –  गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर यवतमाळपाठोपाठ अमरावतीतही लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झालाय. रविवारीपासून जिल्हा बंद ठेवण्यात येणार असून, केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलीय. त्यामुळे अमरावती जिल्हात रविवारी लॉकडाऊनची घोषणा झालीय.
गेल्या चार दिवसांपासून अमरावतीत कोरोनाचे रुग्ण वाढत असून, 14 फेब्रुवारीला 435 रुग्ण सापडले असून, दोन जणांचा मृत्यू झालाय, तर 15 फेब्रुवारीला 439 रुग्ण सापडले असून, 4 जणांचा मृत्यू झालाय. तसेच 16 फेब्रुवारीला 495 रुग्ण सापडले असून, 17 फेब्रुवारीला 498 रुग्ण सापडलेत, तर 6 जणांचा मृत्यू झालाय.
विदर्भात अकोल्यात 74, अमरावतीत 82, अमरावती मनपा क्षेत्रात 310, यवतमाळमध्ये 71 कोरोना रुग्ण आढळले आहेत. अकोला परिमंडळातच एकूण 662 रुग्ण आढळले आहेत. या तिन्ही जिल्ह्याती मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासन अॅलर्ट झालं आहे. गेल्या तीन ते चार महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाने डोकंवर काढलं आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली असून, त्यामुळे ही शहरं अ‍ॅलर्ट झालीत.
नागपुरात कोरोनाचा प्रादुरर्भाव एकीकडे वाढत असताना त्याबाबतच्या नियमांचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने  कारवाई अजून तीव्र केली आहे. निर्धारित संख्येपेक्षा अधिक व-हाडी आढळून आल्याने  काल महापालिकेनं विवाह सोहळा असलेल्या परिवारासह मंगल कार्यालयालाही दंड ठोठावला आहे.  नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने नरेंद्रनगर येथील तुकाराम सभागृहात झालेल्या लग्न समारंभात निर्धारित संख्येपेक्षा जास्त संख्या लोक असल्याने दहा हजार  रुपयांचा दंड वसूल केला धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकानं ही कारवाई केलीय.  तुकाराम सभागृहाचे संचालक व ज्यांच्याकडचे लग्न समारंभ होते त्यांच्याकडून प्रत्येकी 5 हजार रुपये दंड वसूल केला आहे.
तर वर्धा जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये राहणार बंद आहेत. वर्ध्याचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी तसा आदेश जारी केला आहे. वर्धा जिल्ह्याची कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता महाविद्यालये बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व कृषक आणि महाविद्यालये राहणार बंद आहेत.28 फेब्रुवारीनंतर कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय महाविद्यालयाबाबत घेण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.