Home नागपूर मंत्री विजय वड्डेटीवार आणि ठाकरे सरकार विरोधात रामकुंडावर साधु-संतांचे शंखनाद आंदोलन

मंत्री विजय वड्डेटीवार आणि ठाकरे सरकार विरोधात रामकुंडावर साधु-संतांचे शंखनाद आंदोलन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7021*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

65 views
0

विदर्भ वतन,प्रतिनिधी-नागपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच साधुंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या विषयी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11.00 वा रामकुंड, पंचवटी येथे साधु-संतांच्या नेतृत्वात शंखनाद आंदोलन संपन्न झाले.
यावेळी १००८ महामंडलेश्वर सोमेश्वरानंद स्वामी,अ.भा.आखाडा परिषदेचे महंत भक्तिचरणदास, महंत फलाहारी बाबा, निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे ह.भ.प.संजय नाना धोंडगे, अनिकेत शास्त्री, ह.भ.प अर्जुन महाराज पाटील, जय बाबाजी परिवाराचे विष्णु महाराज, रमणगिरी महाराज, अश्विनीनाथ महाराज, सीताराम महाराज, अशोक गवळी, रामसिंग बावरी, सरचिटणीस सुनिल केदार, अमित घुगे, तपोवन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी,सिडको मंडल-2 अध्यक्ष अविनाश पाटील, मध्य मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी, जुने नाशिक मंडल अध्यक्ष भास्कर घोडेकर, नगरसेवक योगेश हिरे, अजिंक्य साने, रुची कुंभारकर, सुरेश खेताडे, सोमनाथ बोडके, लक्ष्मीकांत पारनेरकर, सुनिल वाघ, उत्तमराव उगले, प्रतीक शुक्ल, विपुल मेहता, विजय बनछोडे,हर्षद वाघ, गणेश सानप, शिवम शिंपी आदींसह नाशिक महानगराच्या 10ही मंडलातून जास्त गर्दी होऊ नये म्हणून प्रातिनिधीक स्वरुपात 40च्या आसपास पदाधिकारी कार्यकर्ते या आदोलनात उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आचार्य तुषार भोसले म्हणाले की, आपला सहकारी मंत्री साधुंना नालायक म्हणतो अशावेळी हिंदुहृदयसम्राटांचे सुपुत्र असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झोप कशी लागते? . जनाब उद्धव मिया ठाकरेंच्या मुघल विकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ महिलांवर अत्याचार, हिंदु समाजाचा अपमान, मुलांना डांबून ठेवते, साधुंना शिव्या घालतात अशा रावणालाही लाजवेल अशा स्वैराचारी मुघल विकास आघाडी सरकारचे लवकरच रामकुंडात विसर्जन होऊन महाराष्ट्रात रामराज्य यावे याकरिता आज साधु-संतांनी शंखनाद केला आहे.