
विदर्भ वतन,प्रतिनिधी-नागपूर : आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी.आय.टी.यू) नागपूर जिल्हा कमिटीतर्फे ए. के. गोपालन भवन येथे जनरल बॉडी मीटिंग घेण्यात आली. त्यामध्ये किमान २०० आशा वर्कर उपस्थित होत्या. नोव्हेंबर पासून थकीत मानधन देण्याचे परिपत्रक काढले असल्यामुळे समाधान मानून १५ तारखेला जिल्हा स्तरावर व १७ तारखेला होणारे राज्य स्तरावरील आंदोलन स्थगित करण्यात आले.
जिल्हा अधिवेशन मार्च महिन्याच्या दुस-या आठवड्यात घेणे, राज्य अधिवेशन नागपूर मध्ये घेण्याची तयारी, सदस्यता नोंदणी वाढ हे मुख्य उद्दिष्ट पूर्ण करण्याचे ठरले. आंदोलनात सहभागी संख्या वाढवावी यावर चिंतन करण्यात आले.कोरोना काळापासून आशा वर्कर वर वाढत चाललेल्या दबाव व तणाव यावर तोडगा काढण्याचां निर्णय घेण्यात आला. कामाचा ताण वाढत असून देण्याकरता पैसे नाहीत. काम करायचे नसेल तर राजीनामा द्या. या शासन व अधिका-यांच्या भूमिकेचा निषेध करून एकजुटीने संघषार्ची भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी आंदोलन, वाढती महागाई, वाढत चाललेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडर किमतीवर न बोलता हत्या की आत्महत्या यावर जनतेचे लक्ष विचलित करण्याच्या फडणवीस व सहयोगी यांचे भूमिकेचा निषेध अध्यक्ष राजेन्द्र साठे यांनी व्यक्त केला. या सभेला राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर, कांचन बोरकर, मंगला बागडे, पिंकी सवाईथुल, माया कावळे प्रामुख्याने उपस्थित होते.

