उत्तर नागपुर प्रभाग क्र 2 आपच्या कार्यालयाचे उद्घाटन तसेच अनेक नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7004*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

268

विदर्भ वतन,प्रतिनिधी-नागपूर : बुधवार १७ फेबु्रला “आपचा” विस्तार अंतर्गत सकाळी ६.०० वाजता उत्तर नागपुर विधानसभा क्षेत्रात सम्यक नगर येथे प्रभाग क्र ५ च्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन तसेच अनेक नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे, राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंह व नागपुर संयोजिका कविता सिंघल यांच्या नेतृत्वात करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रामुख्याने राष्ट्रीय समिति सदस्य अमरीश सावरकर, राजेश भोयर, विदर्भ जनसंपर्क संघटन मंत्री आकाश सपेलकर, नागपुर संगठन मंत्री शंकर इंगोले, शहर सचिव भूषण ढाकूलकर, उत्तर नागपुर समन्वयक रोशन डोंगरे, यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
या प्रसंगी सूबेदार गुणवंत सोमकुंवर यांचा नेतृत्वात कालीचरण कुशवाह, अहमद भाई, अशोक डोंगरे, अनिल मानवटकर, गीता सहारे, दीनानाथ सहारे, राजकरण मौर्य, अजय सोमकुंवर, अंजली सोमकुंवर या कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. या नंतर विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे यांनी दिल्लीच्या सरकार याने लोकोपयोगी केलेल्या कामाचा आढावा प्रस्तुत केला. नागपुरात पक्ष वाढविण्याच्या दृष्टिने करावयाच्या कामाची रूपरेखा सांगीतली. जगजीत सिंह, कविता सिंघल यांनी देखील नवीन कार्यकर्त्यांच्ये मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूबेदार गुणवंत सोमकुवर तर सूत्रसंचालन प्रदीप पवनीकर यांनी केले. आभार प्रदीप पैनिकर यांनी मानले.
या कार्यक्रमाला पंकज मिश्रा, प्रदीप पौनिकर, विल्सन लियोनार्ड, शशिकांत रायपुरे, राजेन्द्र शेलकर, प्रशांत निलाटकर, सुनील कोटांगले, सूरज रामटेके, प्यारेलाल प्रजापती, योगेश पराते, गुडू भनारकर इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.