विदर्भ वतन,प्रतिनिधी-नागपूर : संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्ताने दरवर्षी प्रमाणे या वर्षी गोर सिकवाडी, गोरसेना या संघटने तर्फे आणि माहुरखोरा तांडाच्या वतीने 19 फेब्रुवारीला संत सेवालाल महाराज जयंती माहूरखोरा तांडा येथे साजरी केली जाते व गोरसेना, गोर सिकवाडी संघटनेकडून तसेच माहूरखोरा तांडाच्या सौजन्याने बंजारा समाजाच्या गरीब मुला-मुलींचे लग्न सुद्धा निशुल्क लावले जाते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रेमचंद रामावत, मयाराम राठोड (नायक) नरसिंग पवार (कारभारी) माणिक चव्हाण गडचिरोली व विजय चव्हाण धर्मदाय कार्यालय अधीक्षक तसेच सुभाष जाधव गटविकास अधिकारी नागपूर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहील. कार्यक्रमाचे आयोजन माहूरखोरा तांडा, गोर सिकवाडी, गोरसेना नागपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. असे राजू मयाराम राठोड गोरसेना अध्यक्ष यांनी प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.

