Home Breaking News भीषण अपघात, बस कालव्यात कोसळली

भीषण अपघात, बस कालव्यात कोसळली

219 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल –  सतनाकडे निघालेली एक बस कोलव्यात कोसळून हा अपघात झाला. हा अपघात रीवा-सीधी सीमेजवळ छुहियाघाटानजिक घडला. बाणसागर प्रकल्पाच्या कालव्यात ही बस कोसळलीय. या बसमधून जवळपास ५४ प्रवासी प्रवास करत होते.दुर्घटनेनंतर जवळपास सात प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. आत्तापर्यंत ३० मृतदेह हाती लागले आहेत तर इतरांचा शोध सुरू आहे. हा कालवा इतका खोल आहे की संपूर्ण बस कालव्याच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत दिसत आहे.दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी एसडीआरएफची मदत घेण्यात येतेय.क्रेनच्या मदतीनं ही बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दुर्घटनेनंतर जवळपासच्या ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेत दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरू केले.इथे मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित आहेत. बस दुर्घटनेसंबंधी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसंच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य सरकारनं जाहीर केलीय.