Home Breaking News रस्ता सुरक्षा सप्ताहानिमीत्त बेसा येथे कार्यक्रमाचे आयोजन

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमीत्त बेसा येथे कार्यक्रमाचे आयोजन

163 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल – रस्ता सुरक्षा सप्ताहानिमीत्त बेसा येथे क्रांती आँटो चालक श्रमिक संघटनेच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले़ कार्यक्रमाला वाहतुक पोलिस स्टेशन अजनीचे पोलिस निरीक्षक मनोहर कोटनाके,विदर्भ वतन समुहाचे मुख्य संपादक गोपाल कडुकर प्रामुख्याने उपस्थित होते़ यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळून कायदा व सुव्यवस्था राखून ठेवणे ही नागरिकांची जबाबदारी आहे तसेच वाढत्या अपघातांना रोखण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन केले़ कार्यक्रमावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते़ कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघटनेचे अध्यक्ष विक्की धोटे, कार्याध्यक्ष मनोहर गजभिये, मुख्यसचिव शशिपाल मेश्राम, कोषाध्यक्ष महेश शुक्ला, उपाध्यक्ष चरणदास दाभणे, सचिव विश्वनाथ ठाकरे, संघटक शैलेन्द्र ढाले यांच्यासह कार्यकारिणी मंडळ अध्यक्ष भिमसेन गुप्ता, उपाध्यक्ष अमर डोंगरे, सचिव मुन्ना माने, सहसचिव राहुल थेटे, कोषाध्यक्ष सचिव धुर्वे, सदस्य स्वप्नील गोंडे, सदस्य सुरेंद्र राऊत यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले़